weekly horoscope 12th october 2025 to 18th october 2025
Horoscope | राशी भविष्य
साप्ताहिक राशिभविष्य : (१२ ऑक्टोबर २०२५ ते १८ ऑक्टोबर २०२५)
मुंगीचेही मनोरथ असते असं म्हणतात, या म्हणण्यात सृष्टीचे रहस्यच दडलं आहे.
मौल्यवान चीजवस्तू सांभाळा
मेष : सप्ताहातील ग्रहमान पाहता वैवाहिक जीवनातील भावनोद्रेक टाळा. क्रियाप्रतिक्रिया सांभाळा. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींनी मौल्यवान चीजवस्तू सांभाळाव्यातच. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींनी विद्युत उपकरणे जपून हाताळावीत. बाकी गुरुभ्रमणाची स्पंदने ता. १७ व १८ या दिवसात वसुबारस आणि गुरुद्वादशीचा मुहूर्त साधत अतिशय छान परिणामस्वरूप होतील. व्यावसायिक पातळीवर आर्थिक ओघ राहील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना जाहिरात माध्यमांतून लाभ होतील. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग आहेत.