weekly horoscope 13th august 2023 to 19th august 2023
weekly horoscope 13th august 2023 to 19th august 2023Sakal

साप्ताहिक राशिभविष्य (१३ ऑगस्ट २०२३ ते १९ ऑगस्ट २०२३)

मन जपणारा किंवा मनाचा मानभावीपणा जपणारा माणूस नावाचा प्राणी सतत रुसत-फुगत असतोच असतो. माणसाचं उल्हासणं आणि सध्याच्या माणसाच्याच भाषेत त्याचं आखडणं मोठं विचित्र होत चाललं आहे!
Published on

तरुणांचा उत्कर्ष होईल

मेष : सप्ताहाचा आरंभ शुभग्रहांची स्पंदनं कायम ठेवेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींचा सन्मान होईल. परंतु, अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात प्रवासात सांभाळा. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग, घरातील तरुणांचा उत्कर्ष होईल. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येचं प्रभावक्षेत्र शत्रुपीडेचं.

संमिश्र घडामोडींचा कालखंड

वृषभ : मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह संमिश्र स्वरूपात फलदायी होईल. अमावास्येजवळचं रवी-हर्षल योगाचं फिल्ड कुसंगतीतून त्रासाचं. जुगार टाळा. बाकी सप्ताहाचा शेवट छानच. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १८ चा शुक्रवार मोठ्या भाग्याचा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्या अग्निभयाची.

परदेशगमनाची संधी

मिथुन : सप्ताह स्वतंत्र व्यावसायिकांना मोठा प्राप्तीचा. कोर्ट प्रकरणातून यश. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना छप्पर फाड के लाभ. सरकारी कामं मार्गी लागतील. तरुणांना ओळखी-मध्यस्थीतून नोकरी, काहींना परदेशगमनाच्या संधी. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १८ चा शुक्रवार विवाहयोगाचा. नोकरीत उत्तम घडामोडी.

चिंता जाईल, स्पर्धात्मक यश

कर्क : राशीतील शुक्रभ्रमणाचा आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम लाभ होईल. तरुणांना स्पर्धात्मक यश. काहींना वास्तुयोग. मात्र, अमावास्येचं प्रभावक्षेत्र राजकारणी व्यक्तींना विचित्र वादविवादाचं ठरेल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येजवळ एखादी गुप्तचिंता जाईल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट वैयक्तिक ध्येयपूर्तीचा.

धनाची काळजी मिटेल

सिंह : गुरुभ्रमणाची साथ राहीलच. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट जीवनात रंगतच आणणारा. पर्यटनाच्या संधी मिळतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींची धनचिंता जाईल, व्यावसायिक वसुली. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट विजयी चौकार-षटकारांचा. मघा नक्षत्राच्या व्यक्तींनी अमावास्येदरम्यान संसर्गाची पथ्यं पाळावीत.

धावपळीचा कालखंड

कन्या : सप्ताह गर्भवतींना संवेदनशील राहील, जागरूक राहा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्या अपवादात्मक घटनांतून धावपळ करायला लावू शकते. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट व्यावसायिक मंदी चांगलीच घालवेल. मात्र, अमावास्येजवळ कायदेशीर बाबी सांभाळा. हस्त नक्षत्रास ता. १८ चा शुक्रवार घरात सुवार्तांचा.

उतावीळपणा टाळा

तूळ : सप्ताहातील ग्रहमान थोडं परस्परविरोधी राहील, उतावीळपणा नको. सार्वजनिक जीवनात सांभाळा. वक्री शुक्रभ्रमणाचं प्रभावक्षेत्र विशिष्ट नवकल्पनांना वाव देईल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट मोठ्या मजेशीर संधी देईल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १८ चा शुक्रवार भाग्यलक्ष्मीचाच ठरेल. चित्रा नक्षत्रास पर्यटनाच्या संधी.

जुन्या गुंतवणुकीतून लाभ

वृश्‍चिक : ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना रवी-शुक्र युतियोगाचा मोठा लाभ घेता येईल. नवपरिणितांचा भाग्योदय. अनुराधा नक्षत्रास ता. १८ चा शुक्रवार धनचिंता घालवेल. काहींना जुन्या गुंतवणुकीतून लाभ होईल. मात्र, अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात नोकरीत वरिष्ठांना सांभाळा, गैरसमज टाळा.

दुखापतींपासून काळजी घ्या

धनू : सप्ताहात तरुणांनी शारीरिक झटापटी टाळाव्यात. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येचं फिल्ड दुखापतीचं ठरू शकतं. बाकी पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट गुरुभ्रमणाच्या प्रभावातून बोलेलच. अमावास्या मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना गुप्तचिंतेची. पाकीट सांभाळा.

स्वतंत्र व्यावसायिकांना उत्तम फलदायी

मकर : सप्ताहात वक्री शुक्रभ्रमणाचं एक पॅकेज अस्तित्वात राहीलच. श्रवण आणि धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती त्याचा लाभ उठवतीलच. सप्ताह स्वतंत्र व्यावसायिकांना उत्तम फलदायी होईल. मात्र, अमावास्येचं फिल्ड अहंकारी व्यक्तींना अडचणीत आणू शकतं, नोकरीत सांभाळा.

परदेशात भाग्योदय होईल

कुंभ : सप्ताहातील ग्रहमान अमावास्येजवळ हाय व्होल्टेज ठेवेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी आपलं मानसिक संतुलन सांभाळावं. नवपरिणितांनी पथ्यं पाळावीत. बाकी सप्ताहाचा आरंभ आणि शेवट तरुणांना वाव देणाराच. शततारका नक्षत्राच्या तरुणांचा परदेशात भाग्योदय. नोकरीच्या उत्तम संधी. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्या विचित्र संसर्गाची. कुसंगत नको.

नैराश्‍य दूर होईल

मीन : वक्री शुक्रभ्रमणाचं पॅकेज उत्तमरीत्या कार्यान्वित राहू शकतं, फक्त चेहऱ्यावर हास्य ठेवा. मार्केटिंग यशस्वी होईल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींनी अमावास्या घरात सांभाळण्याची, घरात तरुणांशी वाद नकोत. बाकी सप्ताहाचा आरंभ आणि शेवट व्यावसायिक उलाढालींचाच. ता. १८ चा शुक्रवार एकूणच नैराश्‍य घालवेल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना वसुलीतून लाभ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com