weekly horoscope 13th july 2025 to 19th july 2025Sakal
Horoscope | राशी भविष्य
साप्ताहिक राशिभविष्य : (१३ जुलै २०२५ ते १९ जुलै २०२५)
शनी आणि गुरु हे ग्रह आचारसंहितेशी संबंधित आहेत. मानवी हिताचे रक्षण करणारी जी संहिता असते, तीच संहिता पाळण्यासाठी जशी लोकसभा, राज्यसभा कार्यान्वित असते.
व्यवसायातील प्रलोभने टाळा
मेष : सप्ताहात शनी वक्री होत आहे. तरुणांनी सप्ताहात धीर धरावा. सप्ताहात कोणाशीही अकारण स्पर्धा करू नका. प्रवासात सांभाळा. बाकी सप्ताहातील गुरु-शुक्राच्या भ्रमणाचा प्रभाव व्यावसायिकांना मोठी साथ देईल. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना होणारा व्यावसायिक विरोध मावळेल. व्यावसायिक क्षेत्रातील वास्तुखरेदी होईल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना वादग्रस्त वसुलीतून लाभ होतील. उद्याची संकष्टी पुत्रचिंता घालवणारी ठरेल. मात्र सप्ताहात गर्भवतींनी काळजी घ्यावी. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी व्यावसायिक प्रलोभने टाळावीत. बेकायदेशीर व्यवहार टाळावेत. मित्रसंगत जपून करावी.