साप्ताहिक राशिभविष्य : (१३ सप्टेंबर २०२६ ते १९ सप्टेंबर २०२६)

स्वभाव अंतःकरणाशी संबंधित असतो आणि अंतःकरणातील भाव शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यातून प्रकट होत असतो. श्रीगणेश हे दर्शनाशी संबंधित आहेत.
weekly horoscope 13th September 2026 to 19th September 2026

weekly horoscope 13th September 2026 to 19th September 2026

Sakal
Published on

व्यावसायिक ऊर्जा प्राप्त होईल

मेष : सप्ताहात शुक्रभ्रमणाची एक वेगळीच बहार राहील. एकूणच सप्ताह घरात अतिशय मांगल्यपूर्ण वातावरण राहील. अनेकांची मनेस्पित कामे होतील. घरात मुलाबाळांचे भाग्योदय होतील. ता. १३ ते १५ हे दिवस जीवनातील शुभारंभांना उत्तम दिवस राहील. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना दैवी प्रचिती थक्क करेल. वाचासिद्धी प्राप्त होईल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात व्यावसायिक ऊर्जा प्राप्त होईल. सप्ताहाचा शेवट विशिष्ट गाठीभेटीतून भाग्यबीजे पेरेल. ता. १५ ची ऋषिपंचमीची संध्याकाळ विशिष्ट आदरसत्कारातून थक्कच करेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com