साप्ताहिक राशिभविष्य : (१४ जून २०२६ ते २० जून २०२६)

सप्ताहात चंद्र-शुक्र-गुरू त्रिग्रहयोगाचे फिल्ड अद्वितीय अशी शुभफळे देणारेच ठरणार आहे.
weekly horoscope 14th june 2026 to 20th june 2026

weekly horoscope 14th june 2026 to 20th june 2026

Sakal
Published on

स्पर्धात्मक यश देईल

मेष : सप्ताहात चंद्र-शुक्र-गुरू त्रिग्रहयोगाचे फिल्ड अद्वितीय अशी शुभफळे देणारेच ठरणार आहे. सप्ताहातील गुरुपुष्यामृताचा मुहूर्त साधत जीवनातील एक भाग्यसूर्योदयच आपली रास अनुभवेल. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना नक्षत्र लोकातून साथ मिळेल. घरातील प्रिय व्यक्तींची आजारपणे संपतील. परदेशस्थ तरुणांचे प्रश्न सुटतील. राशीतील मंगळ भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना जीवनातील महत्त्वाकांक्षेकडे वाटचाल करवेल. सप्ताह पती वा पत्नीच्या भाग्योदयातून सार्थकी लागेल. ता. १७ व १८ हे दिवस वैयक्तिक मोठे हृद्य समारंभ साजरे करतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट विशिष्ट स्पर्धात्मक यश देईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com