Weekly Horoscope 14th September 2025 to 19th September 2025
Horoscope | राशी भविष्य
साप्ताहिक राशिभविष्य : (१४ सप्टेंबर २०२५ ते १९ सप्टेंबर २०२५)
विशिष्ट ऋणानुबंधातून हा विश्वप्रपंच चालतो आणि हा ऋणानुबंध शेवटी एका ऋणात्मक भावातून परमेश्वराशी जोडला जातो आणि हेच पितृ पंधरवड्याचे मर्म होय.
वादग्रस्त येणी वसूल होतील
मेष : सप्ताहातील ग्रहांचा ट्रॅक फलंदाजीचा नाहीच. फिल्डवर केवळ टिकूनच राहा. शत्रूंना आवाहने देऊ नका. बाकी सप्ताहातील शुभ ग्रहांची भ्रमणे तरुणांना योग्य असे पर्याय देतील. सप्ताहाचा शेवट अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट परिस्थितीजन्य लाभ देतील. सरकारी धोरणे पथ्यकारकच पडतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात उत्तम विवाहस्थळे आणून देईल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक वादग्रस्त येण्यातून जणू लॉटरीच लागेल.