weekly horoscope 15th december 2024 to 21st december 2024
weekly horoscope 15th december 2024 to 21st december 2024Sakal

साप्ताहिक राशिभविष्य : (१५ डिसेंबर २०२४ ते २१ डिसेंबर २०२४)

माणसाचं जीवन हा प्रवास आहे आणि हा प्रवास म्हणजे एक आत्मशोधच म्हणावा लागेल आणि या आत्मशोधाशी उत्तरायणाचा आणि दक्षिणायनाचा संबंध आहे.
Published on

नोकरीतल्या चिंता जातील

मेष : पौर्णिमेच्या प्रभावात सुरू होणारा सप्ताह व्यावसायिक धनवर्षावातून चांगले परिणाम दाखवेल. सप्ताहाची सुरुवात भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना गाठीभेटी, करारमदार आणि सरकारी कामे आदींमधून फलद्रूप होणारी. शुभग्रहांच्या माध्यमांतून सप्ताहात चांगलीच रसद पुरवली जाईल. विवाहेच्छूंना उत्तम विवाहस्थळे येतील. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १८ ची संकष्टी चतुर्थी नोकरीतील गुप्तचिंता घालवणारी. सप्ताहाचा शेवट एखादी पुत्रचिंता घालवेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट उष्णताजन्य विकार वाढवतील. घरातील लहान मुले सांभाळा.

दंतव्यथेचा त्रास होईल.

वृषभ : पौर्णिमेच्या प्रभावात गुरुभ्रमण प्रभावी होईल. एकूणच सप्ताह आपल्या राशीस असणारी धनचिंता घालवेल. तरुणांना सप्ताहातील गुरु-शुक्राचा शुभयोग ऊर्जा देईल. काहींना कला व छंद उपक्रमातून मोठी प्रसिद्धी मिळेल. मृग नक्षत्राच्या व्यक्ती मोठा जल्लोष साजरा करतील. काहींना परदेशगमनाचे योग आहेत. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात व्यावसायिक जुगार टाळावा. उधार उसनवारी नकोच. रोहिणी नक्षत्रास सप्ताहात दंतव्यथा त्रास देईल.

सरकारी कामामध्ये यश लाभेल

मिथुन : सप्ताहातील पौर्णिमेजवळचे वक्री ग्रहांचं फिल्ड भावनोद्रेकातून सांभाळावं. सप्ताहात व्यावसायिकांना कामगार पीडा सतावेल. बाकी सप्ताहातील गुरु-शुक्राचा शुभयोग आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट पुत्रचिंता घालवेल. काहींना व्यावसायिक पातळीवर सरकारी कामातून यश मिळेल. नोकरीतील बढतीचे संकेत प्रसन्न वातावरण ठेवतील. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात मित्रसंगतीतून त्रास होतील. उमलत्या तरुणाईनं जपलेच पाहिजे. कायदेशीर बाबी जपा. खरेदी-विक्रीच्या व्यवहारात सांभाळा.

मोठ्या यशाची नोंद कराल

कर्क : पौर्णिमेच्या प्रभावात सुरू होणारा सप्ताह शुभग्रहांच्या स्पंदनातूनच बोलेल. ता. १८ ते २० हे दिवस शुभग्रहांचा फास्टट्रॅक ठेवतील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १८ ची संकष्टी मोठ्या भाग्यसंकेताची. स्वतंत्र व्यावसायिकांचे उपक्रम यशस्वी होतील. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह पर्वणीसारखाच राहील. ता. १९ चा गुरुवार मोठ्या यशाची नोंद करेल. विशिष्ट नैतिक विजय संपादन कराल. मात्र घरात भावंडांशी वाद नकोत. नोकरीतील राजकारण सांभाळा. पुनर्वसु नक्षत्राच्या तरुणांना संकष्टीला नोकरीचा लाभ, श्री गणेश कृपा होईल.

संशयास्पद आर्थिक व्यवहार टाळा

सिंह : सप्ताहाची सुरुवात गुरुकृपेची राहील. वैयक्तिक सुवार्ता धडकतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना ओळखीतून नोकरीचा लाभ. बाकी सप्ताहात संशयास्पद आर्थिक व्यवहार टाळा. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात चोरी वा फसवणुकीच्या प्रसंगातून त्रास. सप्ताहात मातृ-पितृ चिंता छायाग्रस्त करू शकते. बाकी सप्ताहाचा शेवट वैयक्तिक उपक्रमातून यश प्रसिद्धीचा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशी नोकरीचा लाभ शक्य. आजची पौर्णिमा दैवी प्रचितीची ठरेल.

कर्जमुक्तीचा आनंद मिळवाल

कन्या : आजची पौर्णिमा नवी क्षितिजे घेऊन उगवणारी. अर्थातच मोठ्या भाग्योदयाचे संकेत मिळतील. हस्त नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताह गाजवणारच आहे. ता. १७ ते १९ हे दिवस अतिशय भावरम्य राहतील. घरात अगदी प्रसन्न वातावरण राहील. मोठ्या प्रसिद्धीचे योग आहेत. नोकरी-व्यावसायिक पार्श्वभूमीवर गतिमान राहणारे दिवस. काहींना व्यावसायिक कर्जमुक्तीचा आनंद होईल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना संकष्टी विशिष्ट संकटातून वाचवेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना आजची पौर्णिमा विवाहविषयक गाठीभेटी यशस्वी करणारी.

कायद्यासंदर्भातील अडचण दूर होईल

तूळ : सप्ताहातील शुक्रभ्रमण वक्री ग्रहांच्या पार्श्वभूमीवरही मंजूळ झुळका सोडेल. घरातील प्रिय व्यक्तींच्या चिंता जातील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना व्याधी चिंतेतून मुक्तता मिळेल. व्यावसायिकांमागची कामगारांची चिंता जाईल. ता. १८ व १९ हे दिवस एकूणच आपल्या राशीस उत्तम संगतीचे राहतील. तरुणांच्या नोकरीच्या मुलाखती यशस्वी होतील. ओळखी-मध्यस्थीतून लाभ होतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींची कायदेशीर प्रश्नातून सुटका होईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना संकष्टी भाग्योदयाची.

स्पर्धात्मक पातळीवर यश मिळेल

वृश्चिक : आजच्या पौर्णिमेचे पॅकेज पूर्ण उपभोगाल. त्यातूनच ता. १८ ते २० हे दिवस चढत्या क्रमानं शुभफळं देतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती मोठ्या प्रभावात येतील. अर्थातच विशिष्ट झेप गाठाल. कलावंत मंडळींना राजकीय आश्रय मिळेल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना संकष्टी श्रीगणेशांच्या प्रसादाची, नवविवाहितांचं जीवन फुलवेल. काहींची प्रेमप्रकरणं मार्गी लागतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना स्पर्धात्मक यश मिळेल.

अनपेक्षित घटनांनी बेरंगाची भीती

धनू : सप्ताहातील ग्रहमानाने अनपेक्षित घटना-प्रसंगातून बेरंग होऊ शकतो. सप्ताहाच्या सुरुवातीला अवधान ठेवाच. बाकी सप्ताहाचा शेवट शुभग्रहांच्या ताब्यातील राहील. सप्ताहात शुक्रभ्रमण पूर्वाषाढा नक्षत्रास विशिष्ट ओळखी मध्यस्थीतून वसुली करून देईल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना एकूणच सप्ताह अडथळ्यांच्या शर्यतीतून नेईल. प्रवासात भान ठेवा. पाकिटाची काळजी घ्या. काहींना अग्निभय संभवते. लहान मुलांना सांभाळा.

विजयाचे चौकार- षटकार माराल

मकर : आजची पौर्णिमा एक मोठे सुंदर पॅकेज घोषित करेल. सप्ताहात बौद्धिक कौशल्यातून लाभ उठवाल. सप्ताहातील शुक्रभ्रमण गुरुच्या शुभयोगातून अक्षरशः जनमानसावर मोहिनी टाकेल. नव्या ओळखी संपादन कराल. श्रवण नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहात विजयी चौकार-षटकार मारतीलच. ता. १८ व १९ हे दिवस विजयोत्सवाचेच. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १८ च्या संकष्टीला मोठी दैवीप्रचिती येईल. शत्रूंवर विजय मिळवाल. एखादा वादग्रस्त भूखंड सोडवाल.

व्यावसायिकांना उत्तम कालखंड

कुंभ : आजची पौर्णिमा शुभग्रहांच्या प्रभावाखाली होईल. बुद्धिजीवी मंडळी त्याचा लाभ करून घेऊ शकतात. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्रास विशिष्ट अलौकिक संधी येतील. त्याचा लाभ करून घ्यावाच. सप्ताहाची सुरुवात महत्त्वाकांक्षी तरुणांना अर्थातच फलदायी होईल. व्यावसायिकांना आजचा रविवार भाग्यबीजं पेरणारा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना कामगारांशी संमिश्ररीत्या फलदायी होईल. सप्ताहात कामगारांशी वाद नकोत. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रभ्रमण पुत्रचिंता घालवेल. घरात विवाह ठरतील.

वादविवाद टाळा, असंगही नको

मीन : आजची पौर्णिमा आपल्या राशीस वरदान देणारीच ठरेल. सप्ताह एकूणच गुरु-शुक्राच्या शुभयोगातून ता. १८ ते २० हे दिवस पूर्णपणे सार्थकी लावणारे. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी-व्यावसायिक पार्श्वभूमीवर एक प्रकारचे उत्तम स्थैर्य मिळेल. विशिष्ट ग्रहण लागलेले प्रश्न सामोपचाराने मिटवाल. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १८ ची संकष्टी चतुर्थी मोठे भाग्यसंकेत देईल. मात्र शनिवारी असंगाशी संग नको. वादविवादात पडू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com