

weekly horoscope 15th february 2026 to 21st february 2026
सरकारी अनुदानातून लाभ होईल
मेष : सप्ताह मोठ्या परिस्थितीजन्य अडचणी आणू शकतो. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींनी याचे भान ठेवणे आवश्यक आहे. भावा-बहिणींना विशिष्ठ स्वरूपाची चिंता ग्रासू शकते. बाकी सप्ताहात भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १८ व १९ हे दिवस नोकरी-व्यावसायिक पार्श्वभूमीवर उत्तम घडामोडीचे ठरतील. स्वतंत्र व्यावसायिकांना अचानक धनलाभातून प्रसन्नता लाभेल. गुरुवार मोठा सार्थकी लागणारा. तरुणांचा आत्मविश्वास वाढेल. कलाकारांना प्रसिद्धियोग चकित करतील. काहींना सरकारी अनुदानातून लाभ होईल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी घरात वृद्धांशी वाद टाळावेत. सप्ताहाची सुरुवात सार्वजनिक बाबींतूनही जपावीच.