weekly horoscope 15th june 2025 to 22nd june 2025
weekly horoscope 15th june 2025 to 22nd june 2025Sakal

साप्ताहिक राशिभविष्य : (१५ जून २०२५ ते २२ जून २०२५)

दिवस आणि रात्र, प्रकाश आणि अंधार यांतून संक्रमित होणारे माणसाचे जीवन एक अनुभूतीचा खेळच म्हणावा लागेल.
Published on

चौकार-षट्काराचे वातावरण

मेष : राशीतील शुक्र भ्रमणामुळे अनेकांना आरंभापासूनच फलंदाजीचेच फिल्ड ठेवता येईल. मोठे चौकार-षटकार मारणार आहात. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना परिस्थितीजन्य असे मोठे लाभ होतील. विशिष्ट ओळखी फलद्रूप होतील. विवाहेच्छूंनी सकारात्मक राहावे. ता. १७ व १८ हे दिवस एकूणच आपल्या राशीस आत्मिक बळ प्रदान करतील. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात कुसंगत टाळावी. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींची विशिष्ट गुप्तचिंता जाईल. व्यावसायिक क्षेत्रामध्ये लॉटरी लागेल.

रेंगाळलेली वसुली होईल

वृषभ : सप्ताहातील ग्रहांचे फिल्ड संमिश्र स्वरूपाची फळे देईल. भावा-बहिणींशी वादविवाद टाळा. सार्वजनिक जीवनात असंगाशी संग नको. बाकी रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ नोकरी-व्यावसायिक पार्श्वभूमीवर गतिमानच राहील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १७ व १८ हे दिवस वादग्रस्त स्वरूपाची किंवा रेंगाळलेली वसुली करून देतील. सप्ताहाचा शेवट मृग नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट महत्त्वाकांक्षा पूर्ण करून देईल. जुन्या गुंतवणुकींतून फायदा होईल. नोकरीत बढतीची चाहूल लागेल.

नोकरीतील राजकारणात पडू नका

मिथुन : शुभग्रहांचे उत्तम फिल्ड राहील. ता. १७ व १८ हे दिवस जीवनातील छान सूर लावून देतील. मात्र कोणाच्या मध्यस्थीत किंवा भांडणात पडू नका. नोकरीतील राजकारणात पडू नका. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्ती सतत सुवार्तांतून मोठा चर्चेचा विषय होईल. सतत उत्सव-समारंभातून मिरवाल. मृग नक्षत्राच्या व्यक्ती मागचे एखादे अपयश धुऊन काढतील. मात्र सप्ताहात शारीरिक मस्तीपासून दूर राहा. द्वाड मित्रांपासून सावधगिरी बाळगा. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात सरकारी माध्यमांतून लाभ.

भागीदारीच्या व्यवहारात दक्षता घ्या

कर्क : सप्ताहातील शुभ ग्रहांचा अंडरकरंट छानच राहील. अट्टाहास नकोच. सहज वाटचाल करत राहा. फक्त घरातील स्त्रीवर्गाची मने सांभाळा. बाकी सप्ताहात नोकरीतील पर्यावरण छान राहील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीचा फायदा मिळेल. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींनी भागीदारीचे व्यवहार करताना सावध. सरकारी नियमांचे पालन करा. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट वैयक्तिक जल्लोषाचा राहील. व्यावसायिक पातळीवर धनवर्षाव होईल. घरात आनंदोत्सव साजरा कराल.

व्यवसायात भांडवल पुरवठा होईल

सिंह : सप्ताहात अष्टमीच्या प्रभावक्षेत्रात अर्थातच ता. १७ व ता. १८ या दिवसांत तरुणांचे मोठे भाग्योदय होतील. मघा नक्षत्राच्या व्यक्तींच्या मनातली विशिष्ट खंत किंवा पोखरणारी गुप्त चिंता जाईल. नोकरीतील शत्रुत्व शमेल. मात्र सप्ताहात घरात वृद्धांची काळजी घ्या. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह म्हणजे एक पर्वणी राहील. विशिष्ट आदरसत्कार होतील. काहींना परदेशी शिक्षणाच्या उत्तम संधी चालून येतील. मित्रमंडळींकडून मोठे सहकार्य मिळेल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत बढतीची लॉटरी लागेल. व्यवसायात उत्तम भांडवलपुरवठा होईल. सरकारी माध्यमे साथ देतील.

विजयोत्सवाचा कालखंड

कन्या : सप्ताहात शिस्तबद्ध राहा. नियोजित कामांचा योग्य पाठपुरावा करा. महत्त्वाचे दस्तऐवज जपा. सप्ताहात घरातील वृद्धांची काळजी घ्या. बाकी सप्ताहात राश्याधिपती बुधाची स्थिती आणि रवीचे संक्रमण नोकरी-व्यवसायात उत्तम परिणामस्वरूप होईल. हस्त नक्षत्राच्या व्यक्ती मोठे चातुर्य दाखवतील. सप्ताहाचा शेवट विशिष्ट विजयोत्सव साजरा करेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्ती शेअर बाजारातून लाभ उठवतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी हितशत्रूंकडे लक्ष ठेवून असावे.

वादविवाद टाळा - आचारसंहिता पाळा

तूळ : सप्ताहात शुभग्रहांची लॉबी ग्रहांचा पटच ताब्यात घेईल. मात्र नवपरिणितांनी घरातील वडीलधाऱ्यांशी आचारसंहिता पाळावी. अकारण वाद टाळा. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १८ चा कालाष्टमीचा बुधवार मोठे यश देणारा. तरुणांचा परदेशी भाग्योदय होईल. नोकरीतील विशिष्ट सावट निघून जाईल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहाच्या सुरुवातीस घरी वा दारी दुरुत्तरे टाळावीत. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात उष्णताजन्य विकार त्रास देतील. काहींना अग्निभय दर्शवते.

संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्या

वृश्चिक : सप्ताह ग्रहयोगांच्या पार्श्वभूमीवर दगदगीचा किंवा ओढाताणीचा वाटतोय. काहींना संसर्गजन्य आजाराच्या बाधा सतावतील. खर्चाचे प्रसंग अस्वस्थ करतील. वाहने नियोजनाचा बेरंग करतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना घरातील लहान मुले सतावतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह संमिश्र स्वरूपात फलदायी होईल. सार्वजनिक जीवनात पथ्ये पाळा. स्त्रीवर्गाशी वाद नको. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट व्यावसायिक मतभेद सामोपचारातून मिटवणारा ठरेल. बाकी सप्ताहात श्वानदंशापासून अगदी सावध राहा.

थोरामोठ्यांचे सहकार्य मिळेल

धनु : सप्ताहात शुभग्रहांच्या माध्यमातून एक फास्टट्रॅक राहील. रेंगाळलेले व्यवहार व कामे मार्गी लागत राहतील. तरुणवर्ग स्पर्धा परीक्षांतून मोठा प्रभाव टाकेल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना थोरामोठ्यांचे सहकार्य मिळेल. ता. १७ व १८ हे दिवस मोठ्या घडामोडींचे असतील. वैवाहिक जीवनात वातावरण खूपच प्रसन्न राहील. पती वा पत्नीच्या नोकरीचा प्रश्न सुटेल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक सुंदर पर्व सुरू होईल. नोकरीतील स्थान बळकट होईल. विशिष्ट स्वरूपाची व्यावसायिक मुहूर्तमेढ रोवली जाईल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट विवाहविषयक गाठीभेटी यशस्वी करणारा असेल.

वाटाघाटी यशस्वी ठरतील

मकर : सप्ताहात आश्वासने देताना सांभाळा. मित्रसंगत जपा. व्यसनी किंवा जुगारी मित्रांपासून सांभाळा. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी अपरिचित व्यक्तींशी व्यवहार टाळावेत. बाकी श्रवण नक्षत्रांच्या व्यक्तींचे मार्केटिंग यशस्वी होईल. घरात उंची किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी होईल. सप्ताहात विशिष्ट पातळीवरची पुत्रचिंता कायमची जाईल. आजचा रविवार विशिष्ट वाटाघाटी यशस्वी करणारा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार आणि पुढे शुक्रवार घरातील सुवार्तांच्या पार्श्वभूमीवर प्रसन्नच ठेवेल. पती वा पत्नीचा भाग्योदय होईल.

शारीरिक वेदनांचा भर मावळेल

कुंभ : रवीचे संक्रमण मोठे परिणामस्वरूप होईल. मनातील नकारात्मक विचार निघून जातील. शारीरिक वेदनांचा भर मावळेल. मात्र धनिष्ठा नक्षत्राने सप्ताहात जुगारसदृश व्यवहार टाळावेत. भागीदारांशी गैरसमज टाळावेत. बाकी सप्ताहात बेरोजगारांना नोकरीच्या संधी येतील. ता. १७ व ता. १८ हे दिवस एकूणच आपल्या राशीस गतिमान राहतील. शततारका नक्षत्रास व्यावसायिक लॉटरी लागेल. विशिष्ट विलंबित येणे येईल. नवपरिणितांना अपत्यसंभवातून प्रसन्न करणारा सप्ताह. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्र सप्ताहात मोठे वलयांकित होणार आहे.

कलाकारांना छान सूर गवसेल

मीन : व्यावसायिक पार्श्वभूमीवर सप्ताह मोठा गतिमानच राहील. ओळखी-मध्यस्थीतून मोठे व्यवहार होतील. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट राजकीय परिस्थितीतून लाभ होतील. मात्र सप्ताहात जुनाट व्याधींच्या पार्श्वभूमीवर पथ्ये पाळावीतच. बाकी सप्ताहात वैवाहिक जीवनात फुलोराचे वातावरण असेल. सप्ताहाचा शेवट मोठा गोड असेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार मोठे भाग्यसंकेत देईल. सप्ताहाचा शेवटही मोठ्या जल्लोषाचाच राहील. कलाकारांना छान सूर गवसेल. भावा-बहिणीची चिंता जाईल. बँकांची कामे होतील. गृहकर्जाला वित्तसंस्थाकडून मंजुरी मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com