

weekly horoscope 15th march 2026 to 21st march 2026
तरुणांनी कुसंगतीपासून जपावे
मेष : सप्ताहातील बुध-मंगळाच्या युतियोगाची पार्श्वभूमी आणि राहूची स्थिती तरुणांनी कुसंगतीपासून जपण्याची आहे. काहींना उष्णताजन्य विकार बळावतील. सप्ताहात भाजण्या-कापण्याचे प्रसंग घडू शकतात. सप्ताहाच्या शेवटी गर्भवतींनी जपावे. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात संमिश्र स्वरूपाचे ग्रहमान राहील. गुरुभ्रमण कुयोगांची तीव्रता कमीच करेल. सप्ताहात व्यावसायिकांचे जाहिरात माध्यमांतून लाभ होतील. सप्ताहाचा शेवट प्रवास यशस्वी करून देईल. अर्थातच प्रवासातील महत्त्वाची कामे यशस्वीही करून देईल. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवारचा गुढीपाडवा दैवी प्रचितीचा ठरेल. घरातील तरुणवर्गाची चिंता जाईल. वृद्धांच्या व्याधींवर औषध लागू पडेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्ती शत्रूवर विजय मिळवतील.