

weekly horoscope 15th november 2026 to 21st november 2026
तरुणांना उत्तम नोकऱ्या
मेष : सप्ताहातील मंगळ गुरू यांचा युतियोग प्रामाणिक प्रयत्नांना निश्चितच यश देणारा. तरुणांना आत्मविश्वास वाढवणारेच ग्रहमान राहील. अश्विनी नक्षत्रास ता. १६ व ता. १७ हे दिवस व्यावहारिक जगतातसुद्धा आपल्या प्रसिद्धीच्या माध्यमातून महत्त्व वाढवतीलच. भरणी नक्षत्रास सप्ताहाचा शेवट सरकारी पाठबळातून लाभसंपन्न करणारा. भावाबहिणींची कार्ये ठरतील. कृत्तिका नक्षत्रास सप्ताहातील शुक्रवारची प्रबोधिनी एकादशी जीवनातील एखादा गॉडफादर भेटवून देईल. सप्ताहात एखादे हरवलेले गवसेल. विवाहेच्छूंच्या मार्गातील अडथळे दूर होतील. घरात तरुणांना उत्तम नोकऱ्या लागतील.