

weekly horoscope 16th august 2026 to 22nd august 2026
रस्त्यावरील बाचाबाची टाळावी
मेष : सप्ताहातील गुरू-बुध सहयोगाची पार्श्वभूमी विशिष्ट चमत्कार घडवणारीच राहील. विशिष्ट शत्रुत्व वा वाद संपतील. ता. २० ते २२ हे दिवस छान फलद्रूप होतील. सरकारी किंवा बँकांची कामे होतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींची आरोग्यविषयक चिंता जाईल. विशिष्ट भावाबहिणींचे प्रश्न मार्गी लागतील. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात हरवाहरवीचे प्रसंग टाळावेत. पैशाचे पाकीट सांभाळा. कृत्तिका नक्षत्रास ता. १६ चा रविवार वाहतुकीत सांभाळण्याचा. रस्त्यावरील बाचाबाची टाळावी. घरातील कामगार वर्गाची मने जपावी. श्वानदंशापासून सावध राहावे.