weekly horoscope 16th february 2025 to 22nd february 2025
weekly horoscope 16th february 2025 to 22nd february 2025Sakal

साप्ताहिक राशिभविष्य : (१६ फेब्रुवारी २०२५ ते २२ फेब्रुवारी २०२५)

आकाशतत्त्वाचा आधार घेत परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चार वाणी स्पंदनशील होत असतात. त्यामुळेच माणसाचा वाणीरूपी संकल्प वैखरी रूपाने जगात प्रकट होत असतो.
Published on

आदर-सत्कार होईल

मेष : सप्ताहाचा आरंभ व्यावसायिक वादग्रस्त वसुलीचा राहील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट घरातील तरुणांचे प्रश्न सोडवणारा. घरात मंगलकार्ये ठरतील. ता. २१ चा शुक्रवार उत्सव समारंभातून उपस्थिती ठेवेल. विशिष्ट आदर सत्कार होतील. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १८ चा शुक्रवार सुवार्तांचीच पार्श्वभूमी ठेवेल. तरुणांना विशिष्ट स्पर्धात्मक यश. विवाहेच्छूंना पसंतीचे मेसेज येतील.

आर्थिक कोंडी दूर होईल

वृषभ : सप्ताहाची सुरुवात मोठी गोड राहील. विशिष्ट उपक्रमांतून मोठ्या प्रशंसेस पात्र व्हाल. थोरामोठ्यांच्या ओळखी जबरदस्त क्लिक होतील. ता. २० व २१ हे दिवस आत्यंतिक प्रवाही राहतील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह मोठे परिस्थितीजन्य लाभ देईल. स्वतंत्र व्यावसायिकांची आर्थिक कोंडी निघून जाईल. मंत्रालयातील अडकलेली कामे पूर्ण होतील. काहींना परिचयोत्तर विवाहाच्या संधी... कार्य पूर्ण होतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ शत्रुत्वाचे भय घालवेल.

नोकरीत उद्दिष्ट साध्य होईल

मिथुन : सप्ताहाचा आरंभ मोठा सुंदर लक्षणीय राहील. नोकरीतील घडामोडी मतलब साध्य करून देतील. आर्द्रा नक्षत्रास आजचा रविवार मोठ्या जल्लोषाचा राहील. प्रेमिकांचे चॅटिंग फलद्रूप होईल. काहींचे परदेशी संधान जुळले जाईल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात विशिष्ट सहकारी धोरणातून लाभ होतील. ता. २१ चा शुक्रवार स्त्रीवर्गातून मोठे सहकार्य करवेल. वास्तुविषयक व्यवहार मार्गी लागतील. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींनी उधार उसनवारी सांभाळावी.

वास्तूविषयक चिंता जाईल

कर्क : सप्ताहाचे पॅकेज शुभग्रहांच्याच ताब्यात राहील. हेच आजचा रविवार दर्शवेल. तरुणांनो संधींचा फायदा घ्या. थोरामोठ्यांच्या मार्गदर्शनाचे भान ठेवा. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट मोठ्या दैवी प्रचितीचा राहील. वास्तुविषयक चिंता जाईल. नोकरीच्या मुलाखतींतून प्रभाव टाकाल. पुनर्वसु नक्षत्रास वसुलीतून लाभ. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २१ चा शुक्रवार घरातील सुवार्तांतून मोठा जल्लोषाचा. नोकरीतील राजकारण सांभाळा.

व्यावसायिक आडाखे यशस्वी होतील

सिंह : सप्ताहातील ग्रहमान व्यावसायिक आडाखे यशस्वी करणारे. सप्ताहात काहींची कर्जमुक्ती होईल. काहींना व्यावसायिक मोठे छान पर्याय गवसतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह मोठी नावीन्यपूर्ण शुभफळे देईल. नोकरीतील आसन बळकटच होईल. वरिष्ठांच्या मर्जीतून मोठी कामे होतील. ता. २१ चा शुक्रवार अनेक बाबींतून शुभलक्षणे दाखवेल. पुत्रचिंता कायमची जाईल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात महत्त्वाच्या गाठीभेटीतून फलदायी होणारी. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना शत्रुत्वावर विजय मिळवून देणारा सप्ताह.

तरुणांना मोठी ऊर्जा मिळेल

कन्या : सप्ताह वैवाहिक जीवनात मोठा हृद्य राहील. नवपरिणितांना पुत्रयोग येतील. सप्ताहाचा आरंभ तरुणांना मोठी ऊर्जा देणारा ठरणार आहे. काहींना मित्र संगतीतील लाभ ता. २१ चा शुक्रवार पूर्णपणे शुभग्रहांचे पॅकेज राबवेल. हस्त नक्षत्राच्या व्यक्ती मोठ्या सुवार्तांतून फ्लॅशन्यूज देतीलच. नोकरीच्या मुलाखतीतून प्रभाव टाकाल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ मोठ्या फलंदाजीचा, स्वतंत्र व्यावसायिकांना बुद्धिकौशल्यातून मोठे लाभ. मात्र राजकारणी व्यक्तींशी जपून राहा.

आरोग्याची चिंता जाईल

तूळ : सप्ताहात लाभग्रहांचे ग्रहयोग चंद्रकलांच्या प्रभावात होत आहेत. विशिष्ट व्यावसायिक कोंडी निघून जाईल. काहींना विशिष्ट कोर्ट प्रकरणातून लाभ होतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ मोठ्या मनाजोगत्या घटनांचा असेल. तरुणांच्या उत्तम नोकरीविषयक मुलाखती होतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना चंद्राची नक्षत्रगत वाटचाल विशिष्ट पूर्वसुकृत फळास आणणारी ठरेल. ता. २१ चा शुक्रवार जल्लोषाचा राहील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींची विशिष्ट आरोग्यचिंता जाईल.

नैराश्‍य दूर होईल

वृश्चिक : आजचा रविवार सप्ताहाची सुलक्षणेच दाखवेल. सप्ताह अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना श्रद्धा बळकट करणाराच ठरेल. आरंभ आणि शेवट होतकरू तरुणांचे नैराश्य घालवेल. ता. २१ चा शुक्रवार काहींची नवसपूर्ती करेल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींची पुत्रचिंता जाईल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात पती वा पत्नीच्या उत्कर्षातून धन्यता मिळेल. काहींची वास्तुविषयक व्यवहारातील कोंडी जाईल. मात्र सप्ताहात प्रवासातील संसर्ग सांभाळा.

कटू शब्दांचा वापर टाळाच

धनू : सप्ताहात शुभग्रहांची लॉबी गुप्तपणे क्रियाशील राहीलच. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्ती त्याचा उत्तम लाभ घेतील. सप्ताहाची सुरुवात बुद्धिकौशल्याने लाभ घेण्याची असेल. स्वतंत्र व्यावसायिकांना सप्ताह चांगलाच साथ देईल. नोकरदारांच्या कष्टाचे चीज होईल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात विशिष्ट कोर्ट प्रकरणात यश येईल. तरुणांना सप्ताह नोकरीविषयक मुलाखतींतून फलदायी होणारा. सतत ऑनलाइन राहाच. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी बोलाचालीत कटू शब्द टाळावेत. नवपरिणितांनी जपावं.

नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील

मकर : सप्ताह आजच्या रविवारच्या सुप्रभावी चांगलीच लक्षणे दाखवेल. अर्थातच विशिष्ट सुवार्तांतून ऊर्जासंपन्न व्हाल. सप्ताह तरुणांची अपेक्षापूर्ती करेल. सज्जन माणसांच्या संपर्कात राहाच. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना त्याचा निश्चितच फायदा होईल. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट हास्यकल्लोळात साजरा कराल. सप्ताहात जॉब मार्केटबरोबरच मॅरेज मार्केटशी कनेक्टिव्हिटी साधत राहाच. ता. २१ चा शुक्रवार मोठा प्रसन्न असेल. उत्तराषाढा नक्षत्रास नोकरीत वरिष्ठांचा कृपाशीर्वाद होईल. धनिष्ठा नक्षत्राने घरगुती उत्सव समारंभात क्रोध आवरावा.

परदेशात कलाकारांना यश

कुंभ : सप्ताहात चंद्राचे नक्षत्रांतर्गत होणारे शुभग्रहांशी योग तत्काळ फलदायी होतील. होतकरू तरुणांना मोठे साथ देणारे नक्षत्र योग. ता. १९ ते २० हे दिवस आत्यंतिक प्रवाही आणि जोषपूर्ण राहतील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २१ चा शुक्रवार भाग्य घेऊन येणारा. पुत्रपौत्रांचे भाग्योदय होतील, जीवन सार्थकी लावतील. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्रास एखादा नैतिक विजय प्राप्त होईल. कलाकारांचे परदेशी भाग्योदय, धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार संध्याकाळ विचित्र गुप्तचिंतेची. अर्थातच संशयपिशाचाची.

हरवलेला सूर गवसेल

मीन : सप्ताहाची सुरुवात मोठ्या सुवार्तांच्या प्रभावात सुरू होईल. सप्ताहातील विशिष्ट नक्षत्र शुभयोग नक्षत्रलोकातून लाभ देतील. आजची संकष्टी चतुर्थी एखादा नवस पूर्ण करेल. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहात आपल्या बुद्धिकौशल्यातून लाभ उठवतील. ता. २० आणि २१ हे दिवस जीवनातील सूर गवसून देतील. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तीच्या जीवनात संतसज्जनांचा सहवास सुरू होईल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात नोकरीतील पर्यावरण सुधारून निश्चिंतपणा येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com