

weekly horoscope 17th may 2026 to 23rd may 2026
मौल्यवान वस्तू सांभाळाव्यातच
मेष : सप्ताहातील ग्रहमान आपल्या एकूणच राशीस जुगारसदृश व्यवहारांतून अडचणीत आणू शकते. सप्ताहातील हर्षलशी होणारे ग्रहयोग तारुण्याच्या विचित्र उन्मादातून अडचणीत आणू शकतातच. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींनी निश्चितच पथ्ये पाळण्याची आवश्यकता आहे. बाकी सप्ताह कलावंत आणि बुद्धिमान मंडळींना मोठे परिस्थितीजन्य लाभ देईल. थोरामोठ्यांच्या अचानक गाठीभेटी होऊन चमत्कार घडतील. ता. १९ ते २१ हे दिवस मोठे भाग्यबीजेच पेरतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होतील. परदेशातील मुलाबाळांचे प्रश्न सुटून घरात आनंद साजरा कराल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २१ चा गुरुपुष्यामृतयोग अनेक घटना-गोष्टींतून भावरम्य राहील. विशिष्ट संकटनिवारण होईल. मात्र सप्ताहात आपल्या राशीने घरातील मौल्यवान वस्तू सांभाळाव्यातच.