weekly horoscope 18th january 2026 to 24th january 2026
Horoscope | राशी भविष्य
साप्ताहिक राशिभविष्य : १८ जानेवारी २०२६ ते २४ जानेवारी २०२६
बुध आणि शुक्र हे ग्रह रवी आणि पृथ्वी यांच्यामध्ये असलेले अंतर्ग्रह म्हणून संबोधले जातात.
नोकरीच्या मुलाखतींमध्ये यश
मेष : स्वतंत्र व्यावसायिकांना सप्ताह आर्थिक कोंडीतून मुक्त करणाराच. विशिष्ट रेंगाळलेली व्यावसायिक येणी वसूल होतील. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात मोठी स्वप्नपूर्तीची ठरेल. वास्तुविषयक खरेदी-विक्रीचे व्यवहार मार्गी लागतील. ता. १९ व २० हे दिवस गाठीभेटी, मुलाखती आणि महत्त्वाच्या कामांतून भाग्यबीजे पेरणारी. विवाहेच्छुकांना मार्गस्थ करणारे दिवसच आहेत. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट वैयक्तिक उत्सव समारंभातून मोठा भावरम्य राहील. घरातही सुवार्तांचा भर राहील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट पुत्रोत्कर्षातून धन्य करेल. तरुणांना नोकरीच्या मुलाखतीतून यश देणारे.

