

weekly horoscope 18th october 2026 to 24th october 2026
प्रकाशात आणणारा कालखंड
मेष : विजयदशमीचा सप्ताह वैवाहिक जीवनात एखादा विजयोत्सव साजरा करेल. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह एकूणच मानवी सहकार्यातून उत्तम परिणाम करणारा ठरेल. मोठ्या उत्सव समारंभातून उपस्थिती राहील. तरुणांना कलागुणांतून प्रकाशात आणणाराच सप्ताह. भरणी नक्षत्राच्या व्यक्ती ता. २० आणि २१ हे दिवस वैयक्तिक मोठे उत्सव-समारंभ साजरे करतील. विवाहेच्छूंना सप्ताह एकूणच सतत ऑनलाइन कनेक्टिव्हिटी ठेवेल. परदेशस्थ तरुणांच्या मुलाखती यशस्वी होतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात सतत दैवी प्रचितीचा अनुभव येईल.