weekly horoscope 18th september 2022 to 24th september 2022
weekly horoscope 18th september 2022 to 24th september 2022sakal

साप्ताहिक राशिभविष्य (१८ सप्टेंबर २०२२ ते २४ सप्टेंबर २०२२)

शिव आणि शक्तीच्या संयोग आणि वियोगातून हा सृष्टीचा खेळ अव्याहत चालत आला आहे. शिवशंकरांच्या सत्‌, चित्‌ आणि आनंदस्वरूप अशा आदिसंकल्पापासून विभक्त झालेला जीव किंवा मनुष्य मीच संकल्प करतो.
Published on

खेळाडू, कलावंतांना चांगला काळ

मेष : सप्ताहाचा आरंभ शुक्र, हर्षल योगातून आणि बुध, गुरू यांच्या स्थितीतून खेळाडू, कलावंत व बुद्धिजीवी मंडळींना छानच. ता. २० व २१ हे दिवस भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना छान प्रचिती देतील. राजकारणी व्यक्तींना शत्रुत्वाच्या झळा बसतील. सप्ताहाचा शेवट कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रोत्कर्ष.

मुलाखतींमध्ये यश

वृषभ : गुरू, बुधाची स्थिती जबरदस्त क्‍लिक होणारी. नोकरीच्या मुलाखती यशस्वी होतील. मृग नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताह गाजवतील. परदेशस्थ तरुणांचा भाग्योदय. वास्तुविषयक खरेदी-विक्रीतून लाभ. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २० व २१ हे दिवस घरातील सुवार्तांतून भावोत्कट. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना स्पर्धात्मक यश.

ऐतिहासिक क्षणांचा अनुभव येईल

मिथुन : शुक्राशी होणारे योग आणि बुधाची अफलातून अशी स्थिती; ऐतिहासिक असे सुंदर क्षण अनुभवाल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींचं आत्मिक बळ प्रंचड वाढेल. ता. २० व २१ हे दिवस ग्रहांच्या शुभस्पंदनाचे. महत्त्वाच्या गाठीभेटी कराच. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीचा लाभ.

जुन्या गुंतवणुकीतून लाभ

कर्क : शुभग्रहांची मंत्रालयं क्रियाशील राहतील. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना अचानक धनलाभ. पुष्य नक्षत्राच्या व्यक्ती सन्मानित होतील. सरकारी कामं, तरुणांचे शैक्षणिक प्रश्‍न सुटतील. काहींच्या जुन्या गुंतवणुकी फलद्रूप होतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम प्रवासयोग.

नोकरीत प्रसन्न वातावरण राहील

सिंह : ग्रहयोगांतून शुक्रभ्रमण ग्रहांचा पट ताब्यात घेईल. सप्ताहात बौद्धिक चातुर्याचा चांगला उपयोग कराल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतील घटना प्रसन्न ठेवतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १९ व २० हे दिवस अतिशय सुंदर प्रवाही. सतत आगतस्वागत. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट वलयांकित करणारा.

भाग्योदयाच्या संधी येतील

कन्या : राशीताल शनी, बुधाची स्थिती गुरुभ्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर अतिशय वेचक-वेधक फळे देईल. तरुणांना मोठ्या भाग्योदयाच्या संधी. ता. १८ व १९ हे दिवस जबरदस्त क्‍लिक होणारे. उत्तरा नक्षत्राच्या व्‍यक्तींना दैवी प्रचिती येईल. हस्त नक्षत्रास परदेशी संधी मिळेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार पर्यटनाचा ठरेल.

नोकरीतल्या चिंता संपतील

तूळ : ग्रहांच्या शह-काटशहातूनसुद्धा शुक्रभ्रमण आपल्या सुगंधित झुळुका सोडणार आहे, विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी त्याचा अवश्‍य लाभ घ्यावा. ता. १८ व १९ हे दिवस भाग्यबीजं पेरणारे. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींची नोकरीताल चिंता जाईल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींनी घरात शांत रहावं.

सप्ताहाचा शेवट विजयाने होईल

वृश्‍चिक : सप्ताहात शुभग्रहांचं पॅकेज राहील, शिवाय गुरुभ्रमणाची पकड घट्ट होईलच. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींवर गुरूची पूर्ण कृपा राहील. ता. १८ ते २० हे दिवस उत्तम घडामोडींचे. ज्येष्ठ नक्षत्राच्या तरुणांना सप्ताहाचा शेवट मोठ्या विजयोत्सवाचा. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींचा सन्मान होईल.

नोकरीतला विरोध संपेल

धनू : सप्ताह मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना ऐतिहासिक अशी सुंदर फळं देईल, एखादं हृदयशल्य निघून जाईल. ता. १८ व १९ हे दिवस सुवार्तांची पंरपरा ठेवतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहाचा शेवट गाजवतील. नोकरीतील विरोध मावळेल. पती व पत्नीचा उत्कर्ष होईल. शनिवारी चैन कराल.

बढतीची शक्यता

मकर : सप्ताहातील शनी, बुधाची स्थिती गुरुभ्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर तरुणांना छान राहील; नोकरीतील घडामोडी, बढती दृष्टिपथात आणतील. न्यायालयातील एखादं व्यावसायिक प्रकरण सुटेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींचा सन्मान, श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २१ चा दिवस गुरुप्रचितीचा, धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना प्रेमविवाहाचा योग.

वैवाहिक जीवन छान फुलेल

कुंभ : सप्ताह म्हणजे शुक्रभ्रमणाचीच सप्तपदी राहील. वैवाहिक जीवन छान फुलेल. व्यावसायिक लाभांची सतत परंपरा राहील. पूर्वा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचा सप्ताहाचा आरंभ आणि शेवट अलौकिक राहील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रोत्कर्षातून धन्यता. आजचा रविवार मोठा प्रसन्न.

परदेशगमनाचा योग

मीन : रवी, बुधाची पार्श्‍वभूमी राशीतील गुरुभ्रमणाचा प्रभाव पूर्णपणे वाढवेल. पूर्वा भाद्रपदा आणि उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचं आत्मिक बळ वाढेल. सप्ताहाची सुरुवात नोकरीत छान. थोरामोठ्यांच्या ओळखीतून लाभ. ता. २० व २१ हे दिवस मोठी भाग्यबीजं पेरणारे. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमनाचा योग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com