

weekly horoscope 19th april 2026 to 25th april 2026
महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल
मेष : अक्षय्य तृतीयेने सुरू होणारा सप्ताह राशीतील शुक्रभ्रमणाचे एक पॅकेजच राबवील. तरुणवर्गास अतिशय चांगले ग्रहमान राहील. ता. २३च्या गुरुपुष्यामृत योगाजवळ एखादा भव्य शुभारंभच होईल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्ती लक्ष वेधून घेतील. जीवनातील एखादी मोठी महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल. भरणी नक्षत्राच्या व्यक्ती आजचा रविवार घरात मोठा प्रसन्न राहील. घरातील धार्मिक कार्यातून मोठी दैवी प्रचिती मिळेल. एखादी ग्रासलेली पुत्रचिंता जाईल. शुक्राचे राश्यांतर अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक आर्थिक चिंतेतून मुक्त करेल. विशिष्ट व्यावसायिक वादग्रस्त येणे वसूल कराल. सप्ताहातील गुरुवार आणि शुक्रवार खऱ्या अर्थाने शुभ बोलतील. घरातील तरुणांचे विवाह निश्चितच मार्गस्थ होतील. बाकी सप्ताहातील बुध, मंगळ आणि शनी यांचा त्रिग्रहयोग संमिश्ररीत्या बोलेल. नोकरीतील क्रिया-प्रतिक्रिया सांभाळा. यंत्रे, वाहने आणि कामगार या त्रिघटकांतून अडचणी येऊ शकतात.