Read weekly Rashi bhavishya in marathi langauge | weekly Horoscope - 19th February 2023 to 25th February 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

weekly horoscope 19th february 2023 to 25th february 2023

साप्ताहिक राशिभविष्य (१९ फेब्रुवारी २०२३ ते २५ फेब्रुवारी २०२३)

सरकारदरबारी अडचणी

मेष : सप्ताहारंभ अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येच्या पार्श्‍वभूमीवर व्यावसायिक नुकसानीच्या भयाखाली ठेवू शकतो. काहींना सरकारी माध्यमातून जाचक. बाकी ता. २२ व २३ हे दिवस एकूणच सुवार्तांचे. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना वसुलीतून लाभ. बॅंकेची कामं, सुंदर प्रवासाचा योग.

नोकरीची शक्यता

वृषभ : सप्ताहात राशीचा मंगळ प्रचंड उत्साह ठेवेल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना स्पर्धात्मक यश. कॅम्पसमधून नोकरीची शक्यता. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याच्या अमावास्येचं प्रभावक्षेत्र नोकरीत वरिष्ठांशी विसंवादाचं. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २२ व २३ हे दिवस वैवाहिक जीवनात भाग्योदयाचे.

विजयाचे चौकार-षटकार माराल

मिथुन : उद्याच्या अमावास्येचं प्रभावक्षेत्र मानवी उपद्रवातून त्रास देणारं, यंत्रं - उपकरणं यांपासून जपा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना कामगार पीडा. बाकी ता. २२ ते २४ हे दिवस नोकरीत सुवार्तांचे. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्ती विशिष्ट विजयी चौकार, षटकार मारतील. विशिष्ट शैक्षणिक चिंता जाईल.

व्याधींची काळजी घ्या, वस्तूंना जपा

कर्क : पुष्य नक्षत्रास उद्याची अमावास्या विशिष्ट शारीरिक वेदनायुक्त व्याधीची. दंतव्यथा. बाकी ता. २२ व २३ हे दिवस उत्तम प्रवाही राहतील. नोकरीत भाग्योदय. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शनिवार वस्तू हरवण्याचा, काळजी घ्या. समारंभात आपल्या चीजवस्तूंना जपा.

क्रोधाला आवर घाला

सिंह : मघा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याची अमावास्या शनीच्या छायेतील, क्रोध आवरा. घरातील वृद्धांची काळजी घ्याच. बाकी ता. २२ व २३ हे दिवस शुभग्रहांच्या ताब्यातील. मघा नक्षत्राच्या व्यक्तींवर धनवर्षाव. नोकरीत बदलीतून लाभ. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत बढतीची चाहूल.

महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील

कन्या : उद्याच्या अमावास्येचं प्रभावक्षेत्र सोडल्यास सप्ताह सुवार्तांचा सुगंध ठेवेल. वैवाहिक जीवनातून आनंद साजरा कराल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींची विशिष्ट महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींच्या जीवनात बलवत्तर विवाहयोग. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार विचित्र दुखापतींचा ठरू शकतो, सावधानता बाळगा.

व्यावसायिकांना तेजीचा अनुभव

तूळ : सप्ताह तरुणांनी जपण्याचाच. चित्रा नक्षत्राच्या तरुणांनी कुसंगत टाळावी. बाकी सप्ताह व्यावसायिकांची तेजी ठेवेल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींची व्यावसायिक प्रदर्शनं यशस्वी होतील. सरकारी कामांतून यश. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार विचित्र भांडणाचा.

रेकॉर्डब्रेक यशाचा कालखंड

वृश्‍चिक : उद्याच्या अमावास्येनंतर शुभग्रहांची लॉबी अतिशय क्रियाशील राहील. ता. २२ व २३ हे दिवस रेकॉर्डब्रेक असं यश देतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्ती सुवार्तांतून चर्चेत राहतील. तरुणांना स्पर्धात्मक यश, मित्रांकडून लाभ. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी समारंभातून जपावं.

परदेशात नोकरीची संधी

धनू : उद्याच्या अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात दुखापतीपासून सांभाळावं. बाकी ता. २२ ते २४ हे दिवस शुभग्रहांचा अंडरकरंट ठेवतील. घरात सुवार्तांचा भर ठेवतील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींच्या जीवनातील मोठे करारमदार. घरात कार्यं ठरतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशात नोकरीची संधी.

नोकरीत नवं छान पर्व

मकर : उद्याची अमावास्या उत्तराषाढा नक्षत्रास शारीरिक वेदनेतून त्रासाची. काहींना स्नायुपीडा. बाकी नंतर ता. २२ ते २४ हे दिवस वैयक्तिक सुवार्तांचा सुगंध ठेवतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींचं वैवाहिक जीवन फुलारेल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी वादविवाद टाळावेत. बाकी सप्ताह नोकरीतील एक नवं छान पर्व सुरू करेल.

ग्रासणारी चिंता संपेल

कुंभ : राशीतील अमावास्येचं एक आवर्त राहील. जुनी वादग्रस्त प्रकरणं उकरू नका. बाकी अमावास्येनंतर गुरू-शुक्र सहयोगाचं एक छान पर्व सुरू होईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींची एखादी ग्रासलेली चिंता जाईल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २२ ते २४ हे दिवस उत्तम व्यावसायिक प्राप्ती ठेवतील. तरुणांना ओळख, मध्यस्थीतून नोकरी.

विवाहयोग व नोकरीतही चांगला काळ

मीन : उद्याच्या अमावास्येचं एक प्रकारचं प्रदूषण राहीलच. संशयास्पद वागू नका. बाकी राशीतील गुरू-शुक्राची स्पंदनं अमावास्येनंतर उत्तम राहतील. मंगळ भ्रमणाचीही उत्तम साथ राहील. आगामी पंधरवड्यात तरुणांचं रंग बरसे होईल. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती बहरतील. रेवती नक्षत्रास बलवत्तर असे विवाहयोग. नोकरीत भाग्योदय.