साप्ताहिक राशिभविष्य : (१९ जुलै २०२६ ते २५ जुलै २०२६)

ज्योतिषशास्त्र हे मन आणि बुद्धी यांच्या जाणिवांशी खेळणारे शास्त्र आहे. राशिचक्रातील मिथुन राशीचा मन आणि बुद्धी यांच्या जाणिवांशी घनिष्ठ संबंध येतो.
weekly horoscope 19th july 2026 to 25th july 2026

weekly horoscope 19th july 2026 to 25th july 2026

Sakal
Published on

राजकीय व्यक्ती मदत करतील

मेष : सप्ताह मोठा आत्मविश्वास देणारा राहील. अर्थातच जीवनयात्रा यशस्वी करणाराच ठरणार आहे. तरुणांनी जीवनातील अपूर्व संधींचा लाभ अवश्य घ्यावाच. सप्ताहात थोरामोठ्यांचा अवश्य लाभ मिळेलच. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींचे पूर्वसुकृत फळास येईल. विशिष्ट नवस फेडालच. ता. २१ चा दुर्गाष्टमीचा दिवस सुवार्तांतून सद्‍गदित करेल. तरुणांना विशिष्ट स्पर्धात्मक यश मिळेल. भरणी नक्षत्रास ता. २१ ते २३ हे दिवस धनवर्षाव करणारे. विशिष्ट आदरसत्कार प्रसन्न करतील. भावाबहिणींच्या मोठ्या चिंतेतून मोकळे व्हाल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट शत्रुत्वाचे गांभीर्य कमी करेल. राजकीय व्यक्ती मदत करतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com