weekly horoscope 19th november 2023 to 25th november 2023
weekly horoscope 19th november 2023 to 25th november 2023Sakal

साप्ताहिक राशिभविष्य : (१९ नोव्हेंबर २०२३ ते २५ नोव्हेंबर २०२३)

कार्तिक महिन्यात विशिष्ट सूर्यकिरणांचा पृथ्वीवर वर्षाव होत असतो. प्रत्येक सवंत्सरातील प्रत्येक महिना हा विशिष्ट सूर्यकिरणे पृथ्वीवर पाठवतच असतो.
Published on

येणी वसूल होतील

मेष : सप्ताहात जुनाट व्याधींचा प्रकोप होऊ देऊ नका. अश्‍विनी नक्षत्राच्या गर्भवतींनी पथ्ये पाळावीत. बाकी सप्ताह व्यावसायिकांना येणी वसूल करून देईल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहाचा आरंभ आणि शेवट मोठ्या व्यावसायिक करारमदारांतून गाजणारा.

प्रेमविवाहातल्या अडचणी जातील

वृषभ : कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींचे मोठ्या ग्रहांचे केंद्रयोग नोकरी व्यावसायिक हितशत्रूंच्या व्हायरसचे राहील. उद्याचा सोमवार वरील पार्श्‍वभूमीवर जपाच. बाकी आजचा रविवार मौजमजेचा. रोहिणी नक्षत्राची व्यक्ती सप्ताहात प्रकाशझोतात येईल. प्रेम विवाहातील अडचणी जातील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २४ चा शुक्रवार सुवार्तांतून झगमगाट करेल.

व्यवसायात मोठ्या उलाढाली होतील

मिथुन : सप्ताहात मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी आहार-विहारादि पथ्ये पाळावीच. श्‍वानदंशापासून सावध. अपरिचित व्यक्तींशी सांभाळून राहावे. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह शुक्रकलांतून साजरा होणारा. ता. २३ ते २४ हे दिवस प्रत्येक वन-डे जिंकून देणारे. व्यावसायिक मोठ्या उलाढाली. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींचे पती वा पत्नीकडून मोठे कोडकौतुक होईल. कलाकारांचे भाग्योदय.

विवाहयोग व पर्यटनाच्या संधी

कर्क : सप्ताहातील रविमंगळांचे शनिशी होणारे केंद्रयोग तरुणांवर बोलतील. कुसंगत नको. बाकी शुक्रकलांचा उत्कर्ष सप्ताहाच्या आरंभी आणि शेवटी. एकूणच मोठा प्रभाव टाकेल. पुष्प नक्षत्राच्या व्यक्तींचे नोकरीत कौतुक. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात उत्तम पर्यटनाचे योग. ओळखीतून विवाहयोग.

थोरामोठ्यांच्या गाठीभेटीतून लाभ

सिंह : रवि, शनि आणि मंगळ यांचे परस्परांतील केंद्रयोग अहंकारी माणसांना अडचणीत आणू शकतात. वैवाहिक जीवनातील भावबंध जपा. बाकी ग्रहयोग व्यावसायिक उत्कर्षाचेच. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार संध्याकाळ सुवार्तांची. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना थोरामोठ्यांच्या गाठीभेटीतून लाभ. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक लॉटरी.

चौकार-षटकार माराल

कन्या : राशीतील शुक्रभ्रमण सप्ताहाच्या शेवटी खणखणीत चौकार, षटकार मारेल. नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. विशिष्ट आदरसत्कारांतून लाभ. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी सार्वजनिक जीवनातले गैरसमज टाळावेत. संशयास्पद आर्थिक व्यवहार टाळा. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह नोकरीत उत्तमच. काहींना मित्रांकडून लाभ. सरकारी कामे होतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना शेअरबाजारातून लाभ.

सरकारी योजनांचा लाभ

तूळ : सप्ताह आचारसंहिता बाळगायला लावणाराच आहे. अकारण कोणाच्या आहारी जाऊ नका. सार्वजनिक जीवनातील उचापत्या टाळा. सप्ताहारंभ चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी घरगुती वादापासून सांभाळावे, बाकी स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट उत्सवमूर्ती करणारा. काहींना सरकारी माध्यमांतून लाभ. शुक्रवार व्यावसायिक उलाढालीचाच.

मोठ्या धनलाभाची शक्यता

वृश्‍चिक : राशीतील मंगळभ्रमण शनिच्या योगात विशिष्ट उपद्रवमूल्य असलेले. घरातील लहान मुलांना सांभाळा. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट उत्तमच राहील. स्वतंत्र व्यावसायिकांच्या प्राप्तीत मोठी वाढ होईल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार मोठ्या धनलाभाची लक्षणे दाखवेल. शुक्रवार वैवाहिक जीवनात विजयोत्सवाचा. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवार प्रवासात जपण्याचा.

चोरी-नुकसानीपासून काळजी घ्या

धनु : सप्ताहात शुक्रकलांचा मोठा उत्कर्ष राहील. ता. २३ ते २५ हे दिवस चढत्याक्रमाने शुभ. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींचा एखादा नवस फेडला जाईल. वास्तुचिंता जाईल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींचा नोकरीतील नव्या जडणघडणीतून लाभ होईल. शुक्रवारी एखादा मोठा विजय नोंदवाल. सप्ताहात उत्सव - समारंभात चोरीनुकसानी सांभाळा.

खरेदी-विक्रीत फसवणुकीपासून जपा

मकर : सप्ताहाचा प्रारंभ नोकरीतील घडामोडींतून प्रसन्न ठेवणारा. तरुणांना परदेशाचे वेध लागतील. बाकी सप्ताहात विचित्र मित्रसंगत टाळा. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना खरेदी-विक्रीत फसण्याचे योग. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २३ व २४ हे दिवस सरकारी माध्यमांतून लाभ देतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारचा दिवस रंगबरसे करणारा. विवाहयोगसुद्धा आहेत.

उत्तम नोकरीच्या संधी

कुंभ : रविमंगळ आणि शनि यांचे परस्परांतील योग साडेसातीच्या पार्श्‍वभूमीवर झळा पोहोचवू शकतात. नोकरीत नमते घ्या. नवपरिणितांनी गैरसमज टाळावेत. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना वैवाहिक जीवनातून आचारसंहिता पाळावी लागेल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २३ ते २५ हे दिवस ओळखी मध्यस्थींतून लाभ देतील. आर्थिक कोंडी जाईल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम नोकरीचा लाभ.

नोकरीसाठीच्या मुलाखतींमध्ये यश

मीन : सप्ताहातील शुक्रभ्रमण अतिशय सुंदर भूमिका निभावेल. वैयक्तिक मोठे उत्सवसमारंभ होतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींच्या जीवनाला शुक्रकलांच्या माध्यमातून फुलोरा येईल. गाठीभेटीतून छाप पाडाल. नोकरीविषयक मुलाखती यशस्वी होतील. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात कायदेविषयक बाबी त्रास देऊ शकतात. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार विचित्र चोरीचा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com