weekly horoscope 1st june 2025 to 7th june 2025
weekly horoscope 1st june 2025 to 7th june 2025Sakal

साप्ताहिक राशिभविष्य : (०१ जून २०२५ ते ०७ जून २०२५)

आपल्या संस्कृतीत पंचमहाभूतांना देवतास्वरूप मानण्यात येते. किंबहुना या देवताच विश्वप्रपंच चालवत असतात अशी श्रद्धा ठेवत आपण अनेक सणवार साजरे करत असतो.
Published on

आरोग्याची काळजी घ्या

मेष : राशीत शुक्राचे नुकतेच पदार्पण झाले आहे. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना हे शुक्रभ्रमण सप्ताहात उत्तम फलद्रूप करणारे असे आहे. विवाहेच्छूंना ते योग्य स्थळे आणून देईल. सप्ताहाच्या शेवटी हे शुक्रभ्रमण मोठा विजयोत्सव साजरा करेल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ थोडा आरोग्यविषयक कटकटींचा ठरण्याची शक्यता आहे. बाकी सप्ताहाचा शेवट अर्थातच ता. ६ व ७ हे दिवस विशिष्ट विलंबित करारमदार करून देणारा ठरेल. कायदेशीर बाबींविषयक अडचणी संपतील.

शुभग्रहांची साथ मिळेल

वृषभ : सप्ताहाचा आरंभ भाजण्या-कापण्यापासून जपण्याचा. बाकी पुढे ता. ३ च्या अष्टमीनंतर शुभग्रह आपली भूमिका उत्तम बजावतील. परिस्थितीची उत्तम साथ मिळेल. व्यावसायिक वसुलीतून निश्चिंत व्हाल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट मानसन्मानातून लाभ होतील. कलाकारांचे आणि खेळाडूंचे मोठे भाग्योदय होणार आहेत. ता. ५ व ६ हे दिवस एकूणच झगमगाट करणारे आहेत. मृग नक्षत्राच्या व्यक्ती विशिष्ट अपयश धुवून काढतील. नोकरीत कर्तृत्वाला उजाळा मिळेल.

कामे मनाजोगती होतील

मिथुन : सप्ताहात लाभस्थानातील शुक्रभ्रमण राशीतील गुरूच्या राज्यात जनसंपर्काच्या माध्यमातून मोठे लाभ देणारेच आहे. नोकरीतील घडामोडी पथ्यावर पडतील. ता. ५ ते ७ हे दिवस मृग नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सुवार्तांची शृंखला ठेवतील. मोठी मनाजोगती कामे होतील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींची विशिष्ट स्वरुपाची सरकारी कामे होऊन जातील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींनी आजचा रविवार चोरी-नुकसानीच्या घटनांपासून सांभाळला पाहिजे. खरेदीत फसू नका. रहदारीत सांभाळा. बाकी सप्ताहाचा शेवट मौजमजेचा असेल. पुत्रचिंता जाईल.

अचानक धनलाभ होईल

कर्क : आजचा रविवार क्रिया-प्रतिक्रियांतून सांभाळण्याचा. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना सूर्योदयी कलहजन्य कालखंड. बाकी सप्ताहाचा शेवट धमाकेदारच राहील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होईल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ३ ची दुर्गाष्टमी महत्त्वाच्या गाठीभेटींतून यश देणारी. थोरामोठ्यांच्या ओळखींतून विलक्षण साथ मिळेल. घरातील तरुणांचे विवाह ठरतील. ता. ५ ते ६ हे दिवस मोठी व्यावसायिक तेजी ठेवतील. काहींची मोठ्या उत्सव-समारंभांतून उपस्थिती राहील. परदेशी जाण्यासाठीचा व्हिसा मिळेल.

चांगली नोकरी मिळेल

सिंह : सप्ताहातील राशींच्या एक्स्चेंजमध्ये भाव खाऊन जाणारी रास राहील. सप्ताहात व्यावसायिक पतप्रतिष्ठा वाढवणाऱ्या घटना घडतील. परदेशी व्यापारात मोठे लाभ होतील. ता. ५ ते ७ हे दिवस अतिशय गतिमान राहतील. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे परिस्थितीजन्य लाभ होतील. नोकरीत मानांकन मिळेल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ३ जूनची दुर्गाष्टमी एखाद्या व्यावसायिक लॉटरीतून थक्क करेल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ६ चा शुक्रवार छान नोकरी देणारा. शनिवार मोठ्या चैनी-करमणुकीचा ठरेल.

यशाचा आलेख चढता राहील

कन्या : सप्ताहात होतकरू तरुणांचे मोठे भाग्योदय होताना दिसतील. ता. ५ ते ७ या दिवसांत यशाचा मोठा चढता आलेख राहील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सतत यशाच्या माध्यमातून हस्तांदोलन होईल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात घरातील प्रिय व्यक्तींच्या भाग्योदयातून मोठी धन्यता मिळेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात नोकरीत वरिष्ठांचा मोठा कृपाशिर्वाद लाभेल. योग्य ठिकाणी बदली करून घ्याल. वास्तुविषयक प्रस्ताव येतील.

आर्थिक कोंडीतून मुक्त व्हाल

तूळ : सप्ताहारंभ मंगळभ्रमणाच्या माध्यमातून सार्वजनिक जीवनातून उपद्रवमूल्य असलेला. कोणत्याही गटबाजीच्या राजकारणात पडू नका. बाकी गुरू आणि शुक्र या ग्रहांशी होणारे योग चांगलाच अंडरकरंट ठेवतील. ता. ५ ते ७ जून हे दिवस उत्तम लयबद्ध राहतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना विवाहयोग आहेत. मंगळवारची अष्टमी गाठीभेटींतून फलद्रूप होणारी. सप्ताहाचा शेवट विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक आर्थिक कोंडीतून मुक्त करणारा. स्वाती नक्षत्रास सप्ताहाचा शेवट वैवाहिक जीवनातून प्रसन्न राहीलच.

परदेशी व्यापारामध्ये लाभ

वृश्चिक : सप्ताहात जुगारसदृश व्यवहार टाळावेतच. बाकी सप्ताहातील मंगळवारची दुर्गाष्टमी व्यावसायिक पातळीवर आर्थिक ओघ वाढवेल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशी व्यापारात लाभ होतील. सरकारी माध्यमांतून साथ मिळेल. पत्नी वा पतीच्या सुवार्ता धन्य करतील. ता. ६ चा शुक्रवार जल्लोषाचाच राहील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट कोर्टप्रकरणातून मुक्तता मिळेल. विशिष्ट नुकसानभरपाई मिळेल. पुत्रचिंता जाईल. नोकरीत सन्मान होईल.

व्यावसायिक क्षेत्रात लॉटरी लागेल

धनु : सप्ताहात गुरू आणि शुक्र या ग्रहांचा इतर ग्रहांच्या ग्रहयोगांतून एकप्रकारचा अंडरकरंट राहीलच. तरुणवर्ग त्याचा सुंदर लाभ उठवेलच. नोकरीविषयक मुलाखतींची उत्तम संधी राहील. ता. ३ ते ५ हे दिवस एकूणच गतिमान राहतील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना अपवादात्मक परिस्थितीतून लाभ होतील. ता. ५ चा गुरुवार सुवार्तांची पार्श्वभूमी ठेवेल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक लॉटरी लागेल. पती वा पत्नीचा भाग्योदय साजरा कराल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी आजच्या रविवारी मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात, अर्थातच प्रवासात.

समारंभात वादविवाद टाळावा

मकर : सप्ताहात मंगळभ्रमणाचा उच्च दाब राहीलच. गडबड-गोंधळ टाळावाच. महत्त्वाचे दस्ताऐवज सांभाळावेत. बाकी सप्ताहातील शुक्रभ्रमणाचा अंडरकरंट क्रियाशील राहीलच. सप्ताहाच्या शेवटी उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्ती या अंडरकरंटचा चांगलाच लाभ घेतील. विशिष्ट करारमदारांतून लाभ उठवाल. ता. ५ चा गुरुवार अनेक माध्यमांतून प्रसन्न ठेवेल. घरात कार्ये ठरतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतील मानसन्मान चकित करतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी आजच्या रविवारी उत्सव-समारंभातून वादविवाद टाळावेत.

मोठी कामे होतील

कुंभ : सप्ताहात आरोग्यविषयक पथ्ये पाळावीच. विशेषतः पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी प्रवासात सांभाळावे. बाकी सप्ताहात गुरूभ्रमणाला शुक्रभ्रमण उत्तम साथ देणार आहे. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींचे नैराश्य जाईल. शैक्षणिक चिंता संपतील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींची मंगळवारची अष्टमी भाग्योदय करणारी ठरेल. थोरामोठ्यांच्या ओळखींतून मोठी कामे होतील. सप्ताहाचा शेवट एकूणच आपल्या राशीस अनेक माध्यमांतून प्रसन्न ठेवेल. सहकुटुंब मोठ्या मौजमजेचे प्रसंग येतील. घरात कार्ये ठरतील.

वरिष्ठांची मर्जी राहील

मीन : सप्ताह अतिशय गतिमानच राहील. मोठ्या व्यावसायिक उलाढाली होतील. व्यावसायिक आडाखे यशस्वी होतील. अर्थातच काहींना उत्तम परिस्थितीजन्य लाभ उठवता येतील. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना शुभग्रहांचे फिल्ड धावा काढण्यास अगदी मोकळे राहील. नवपरिणितांचे जीवन अगदी फुलून जाईल. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीतून मनासारखे करून घेण्याची संधी मिळेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ५ व ६ हे दिवस वैयक्तिक मोठ्या सुवार्तांची परंपरा ठेवतील. साडेसातीची पीडा विसरालसुद्धा !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com