साप्ताहिक राशिभविष्य : (०१ मार्च २०२६ ते ७ मार्च २०२६)

माणसाचे जीवन ही एक छायाच आहे. माणसावर विशिष्ट संस्कारांचा प्रभाव पडणे या गोष्टीला सुद्धा एक छायाच समजतात. यातूनच मातृछाया आणि पितृछाया हे शब्द अवतरले.
weekly horoscope 1st march 2026 to 7th march 2026

weekly horoscope 1st march 2026 to 7th march 2026

Sakal
Published on

व्यावसायिकांची आर्थिक कोंडी जाईल

मेष : सप्ताहात रवी-गुरू शुभयोगाचे एक सुंदर पॅकेज अस्तित्वात राहील. ते सप्ताहात होणाऱ्या चंद्रग्रहणाच्या प्रदूषणावर निश्चित मात करेल. शिवाय रवी-बुध युतियोगही काहींचा विवेक उत्तम जागृत ठेवून विशिष्ट संकटातून वाचवेल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ४ चा बुधवार घबाडयोगासारखाच फलद्रुप होईल. विशिष्ट ओळखी मध्यस्थीतून लाभ होतील. स्वतंत्र व्यावसायिकांची आर्थिक कोंडी जाईल. सप्ताहात आलेल्या योग्य विवाहस्थळांची दखल घ्याच. ज्योतिष आड न आणता अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. सप्ताहारंभी घरात वृद्धांशी वाद टाळावेत. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहात चंद्रग्रहणाजवळ विशिष्ट कायदेशीर प्रश्नांतून गांभीर्य वाढू शकते. उद्याचा सोमवार याचीच लक्षणे दाखवेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com