

weekly horoscope 1st november 2026 to 7th november 2026
वास्तुविषयक व्यवहार होतील
मेष : सप्ताहातील गुरुचे राश्यांतर अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना चांगलेच शुभसंकेत देणारे राहील. तरुणांनी शिक्षणाच्या पार्श्वभूमीवर त्याचा निश्चितच फायदा घ्यावा. फक्त आपल्या ध्येयावरच लक्ष ठेवावं. बाकी गृहस्थी माणसांना यंदाची दीपावलीची चाहूल आनंदमयच जाईल. ता. ३ आणि ४ हे दिवस वैवाहिक जीवनातून आनंद साजरा करणारेच ठरतील. व्यावसायिकांना सप्ताहाचा शेवट आर्थिक कोंडीतून सोडवेलच. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींचे वास्तुविषयक व्यवहार होतील. सप्ताहाचा शेवट व्यावसायिक उत्सव प्रदर्शने यशस्वी करून देईल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना वसुलीतून लाभ.