

थोरामोठ्यांकडून लाभ मिळतील
मेष : सप्ताहातील मंगळ, शुक्र केंद्रयोगाची पार्श्वभूमी आणि अमावस्येकडे झुकणारा सप्ताह एकूणच भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना भावनिक बाबीतून जपण्याचा कालखंड आहे. स्त्रीवर्गाशी वाद नकोतच. बाकी गुरुभ्रमणाचा आंतरप्रवाह विशिष्ट परिस्थितीत थोरामोठ्यांकडून लाभ देईलच. एकूणच सप्ताह वैयक्तिक कला, छंद वा उपक्रमातून मोठा वाव देणारा. काहींना जुन्या गुंतवणुकीतून लॉटरी लागेल. नोकरीतील विशिष्ट जडणघडणी चांगल्याच पथ्यावर पडतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहाच्या शेवटी वेंधळेपणा टाळावा. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्या भातृचिंतेची ठरेल.