साप्ताहिक राशिभविष्य - २० मार्च २०२२ ते २६ मार्च २०२२

माणसाचं मन, शरीर आणि प्राण हे स्वस्थ कधीच नसतात. मनाचं देणं-घेणं, शरीराचं धरणं-सोडणं आणि प्राणाचं (श्‍वासाचं) उत्सर्जन आणि विसर्जन या क्रिया सतत चालूच असतात.
Weekly Horoscope
Weekly HoroscopeSakal

राजकारणापासून दूर राहा

मेष : सप्ताहारंभी बुध-गुरू युतियोगाची अतिशय छान पार्श्‍वभूमी राहील. भरणी नक्षत्राच्या तरुणांनी सतत ऑनलाइन राहावं. नोकरीसाठीच्या मुलाखतींतून यश. ता. २१ व २२ हे दिवस मोठी भाग्यबीजं पेरतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी राजकारणापासून दूर राहावं. अश्‍विनी नक्षत्रास शुक्रवार स्पर्धात्मक यशाचा, पुत्रोत्कर्ष.

छान सूर गवसेल

वृषभ : मृग नक्षत्राच्या व्यक्तींना ग्रहांचं फिल्ड सप्ताहात बॅटिंग फिल्ड राहील. एक छान सूर गवसेल. बुध- गुरू युतियोगाचं फिल्ड ओळखी- मध्यस्थीतून क्‍लिक होईल. ता. २३चा बुधवार वैयक्तिक सुवार्तांतून चर्चेत राहील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींची व्यावसायिक येणी येतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींची ता. २२ची रंगपंचमी स्त्रीमुळे बेरंगाची.

यश व प्रसिद्धी मिळेल

मिथुन : बुध- गुरू- नेपच्यून सहयोग पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना मोठी यश-प्रसिद्धी देणारा. सप्ताहाची सुरुवात मोठी अजब राहील. कलाकारांना मोठे लाभ. काहींना सरकारी बहुमान! आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी यंदाची रंगपंचमी जरा जपून खेळावी. बेरंग नको. व्रात्य मित्रांची संगत नको. बाकी शुक्रवारचा दिवस मोठ्या सुखस्वप्नांचा. वास्तुयोग.

विशिष्ट करारमदार होतील

कर्क : सप्ताहात कोणतीही अरेरावी नको. नाकासमोर चाला. स्त्रीवर्गाशी थट्टामस्करी नको. बाकी व्यावसायिकांना ता. २१ व २२ हे दिवस चांगलीच रंगपंचमी घडवतील. विशिष्ट करारमदार होतील. उत्सव-प्रदर्शनांतून सुंदर प्रतिसाद. पुष्य नक्षत्रास सरकारी माध्यमातून सहकार्य. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना सासुरवास. वाद नकोत.

मंत्रालयातून मोठी कामं होतील

सिंह : सप्ताहातील बुध- गुरू- नेपच्यून त्रिग्रह योगाचं पॅकेज चांगलंच फलदायी होईल. पूर्वा आणि उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना जनसंपर्कातून मोठे लाभ. मंत्रालयातून मोठी कामं होतील. तरुणांना गॉडफादर भेटेल. ता. २२ व २३ हे दिवस खरोखर जीवनात रंग भरतील. मघा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी प्रवासात जपा.

कोर्ट प्रकरण मिटेल

कन्या : सप्ताहात अन्न-पाण्यातील संसर्ग जपाच. बाकी व्यावसायिकांना सप्ताह मंगळ- शुक्राच्या साथसंगतीतून, उत्सव-प्रदर्शनांतून उत्तम प्रतिसाद देईल. हस्त नक्षत्राच्या व्यक्ती दिलखुलास वावरतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी जुगारी मित्र टाळावेत. बाकी ता. २१ व २२ हे दिवस प्रचंड प्रवाही. नव्या ओळखींतून लाभ. कोर्ट प्रकरण मिटेल.

नोकरीत सन्मानाचं पद मिळेल

तूळ : राशींच्या एक्‍स्चेंजमध्ये धमाल उडवणार आहात. आपल्या मध्यस्थीतून मोठी कामं होतील. ता. २१ व २२ हे दिवस चौकार- षटकारांचेच. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना नक्षत्रलोकांतून लाभ. सतत आगतस्वागत आणि अर्थपुरवठा. नवपरिणितांचे प्रश्‍न सुटतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुप्रचिती मिळेल. नोकरीत सन्माननीय पद मिळेल.

परिस्थितीचा लाभ मिळेल

वृश्‍चिक : सप्ताह व्यावसायिक उत्सव-प्रदर्शनं गाजवेल. मंत्रालयातील कामं होतील. विशाखा नक्षत्रास पुत्रोत्कर्ष. अनुराधा नक्षत्रास ता. २२ व २३ हे दिवस आत्यंतिक प्रवाही राहतील. विवाहविषयक गाठीभेटी कराच. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना परिस्थितिजन्य मोठे लाभ. स्त्रीवर्ग प्रसन्न राहील. अर्थातच, देवता प्रसन्न राहतील.

वादग्रस्त भूखंड सोडवाल

धनू : गुरू- बुध- नेपच्यून त्रिग्रह योगाचं पॅकेज उत्तम रन होईल. जनसंपर्कातून मोठे लाभ. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे धनलाभ. एखादा वादग्रस्त भूखंड सोडवाल. ता. २१ व २२ हे दिवस मोठी रंगतदार फळं देतील. वैयक्तिक मोठे समारोह. उत्तराषाढास विवाहयोग. मूळ नक्षत्रास शुक्रवार भाग्याचा.

थोरामोठ्यांचं पाठबळ राहील

मकर : सप्ताहात मंगळ- शुक्र सहयोग राहणारच आहे. सप्ताहाची सुरुवात करारमदार, गाठीभेटी आणि व्यावसायिक उत्सव-प्रदर्शनांतून उत्तम प्रतिसाद देणारी. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती परिस्थितिजन्य लाभ उठवतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना थोरामोठ्यांचं पाठबळ राहील. मात्र, सार्वजनिक ठिकाणी आचारसंहिता पाळा. रंगपंचमीच्या मंगळवारी सावध!

नोकरीच्या मुलाखती होतील

कुंभ : राशीतील बुध- गुरू युतियोगाचं एक छान स्पंदन किंवा आवर्तन राहील. तरुणांना सप्ताह छानच. महत्त्वाच्या नोकरीच्या मुलाखती होतील. ता. २१ ते २३ हे दिवस विशेष उलाढालींचे राहतील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींवर देवता प्रसन्न राहतील. अर्थातच, निसर्ग अनुकूल राहील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रोत्कर्ष धन्य करेल.

नोकरीतील अरिष्ट जाईल

मीन : सप्ताहात गुरू- बुध- नेपच्यून सहयोगाची एक अद्‌भुत पार्श्‍वभूमी राहील. व्रतवैकल्यं फळास येतील. ता. २३ ते २५ हे दिवस तरुणांचे प्रश्‍न सोडवणारे. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना एखादा गॉडफादर भेटेल. नोकरीतील अरिष्ट जाईल. घरातील तरुणांचे प्रश्‍न सुटतील. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींस शुक्रवार मोठ्या सुवार्तेचा. धनलाभ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com