

weekly horoscope 22nd february 2026 to 28th february 2026
रेकॉर्ड ब्रेक यश लाभेल
मेष : सप्ताहाचे बजेट तरुणांना छानच राहील. नकारात्मक विचार पूर्ण टाळा. बुद्धिमान मित्रांच्या सान्निध्यात राहाच. सप्ताहाच्या सुरुवातीस आणि शेवटी स्पर्धात्मक यशातून जीवनाची फास्ट ट्रेन होईल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना रेकॉर्ड ब्रेक यश मिळेल. स्वतंत्र व्यावसायिकांना सप्ताह पर्वणीचाच ठरेल. सार्वजनिक क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनी सप्ताहात अरेरावी टाळावी. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींनी मूर्खांशी वाद टाळावेतच. बाकी ता. २५ ते २७ हे दिवस एकूणच आपल्या राशीस गतिमानच राहतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्ती आपल्या शत्रूंना जरब बसवतील. अर्थातच विशिष्ट यशातून सामाजिक पतप्रतिष्ठा वाढून ता. २७ ची शुक्रवारची आमलकी एकादशी त्याची प्रचिती देईलच. शनिवारचा दिवस छान सहली-करमणुकीचा ठरेल.