

weekly horoscope 22nd march 2026 to 28th march 2026
व्यवसायात तेजी राहील
मेष : सप्ताहाची सुरुवात ग्रहयोगांतून हाय व्होल्टेजचीच राहील. प्रवासातील विशिष्ट अनपेक्षित घटना बेरंग करू शकतात. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावीच. घरातील वृद्धांची काळजी घ्यावी. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींनी ता. २६ ते २८ हा सप्ताहाचा शेवट मोठा मनोरंजन करणारा राहील. रसिक मंडळींच्या गाठीभेटींतून आनंद साजरा कराल. गुरुवारची श्रीरामनवमी देवदर्शनातून अनुभूती देईल. पुत्रोत्कर्षाच्या वार्ता धन्य करतील. अर्थातच परदेशस्थ मुला-मुलींचे भाग्योदय होतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींची सप्ताहाची सुरुवात वैवाहिक जीवनातून धन्य करेल. शनिवारची एकादशी रात्री सुखनिद्रा देईल. सप्ताहात व्यावसायिक तेजीच राहील. मात्र उधार-उसनवारी करताना सावधच! खरेदीत सांभाळा. संमोहन टाळा.