weekly horoscope 24th december 2023 to 30th december 2023 pjp78
weekly horoscope 24th december 2023 to 30th december 2023 pjp78Sakal

साप्ताहिक राशिभविष्य : (२४ डिसेंबर २०२३ ते ३० डिसेंबर २०२३)

सृष्टीतील मातृभाव हा अनसूयेच्या रूपात प्रकट होत असतो किंबहुना तो तसा प्रकट झाला आहे.

पूर्वसंचितामधून लाभ मिळेल

मेष : उत्तरायणाच्या आगमनात अश्विनी नक्षत्राच्या व्यक्ती रवी-गुरु शुभयोगाचे उत्तम लाभ घेईल. पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र पूर्वसंचितातून लाभ देईल. नवपरिणितांचे भाग्योदय. वैवाहिक जीवन फुलेल. ता. २८ व २९ हे दिवस एकूणच पूर्ण मेष राशीस छानच. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींचा वास्तुप्रवेश होईल.

वादग्रस्त येणं वसूल होईल

वृषभ : वक्री बुधाची स्थिती मृग आणि कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना कुपथ्यातून विचित्रच राहील. अन्नपाण्यातील संसर्ग जपा. खरेदी-विक्रीत सांभाळा. बाकी पौर्णिमेजवळ घरात सुवार्तांची पार्श्वभूमी. नाताळ मोठ्या मौजमजेचा. ता. २८ चं गुरुपुष्यामृत व्यावसायिक शुभारंभाचं ठरेल. वादग्रस्त वसुली होईल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रोत्कर्षातून धन्यता लाभेल.

सरकारी बहुमान मिळेल

मिथुन : पौर्णिमेची पार्श्वभूमी आर्द्रा नक्षत्रास मोठी भावोत्कट राहील. ता. २६ व २७ हे दिवस नोकरीत मोठे शुभसंबंधित राहतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना नाताळचा सोमवार ओळखीतून विवाहयोगाचा. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना ख्रिसमस परदेशगमनाचाच. काहींना सरकारी बहुमान मिळेल.

प्रवासात दुखापतींपासून जपा

कर्क : ख्रिसमसचा सप्ताह मोठी भाग्यबीजं पेरेल. सप्ताहाचा आरंभ पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत मोठ्या उत्कर्षाचा. श्री दत्तात्रेय जयंती आध्यात्मिक प्रचितीची. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना कर्जमंजुरी. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह वास्तुचिंता घालवणारा. काहींचं विशिष्ट वादग्रस्त येणं येईल. मात्र प्रवासात दुखापती जपा.

मोठा मानसन्मान होईल

सिंह : सप्ताहातील पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र दत्तकृपेचा वर्षाव करणारं. पुत्रपौत्रांचे भाग्योदय होतील. मघा नक्षत्राच्या व्यक्तींचा मोठा मानसन्मान होईल. ता. २६ ते २९ हे दिवस चढत्या क्रमानं शुभ. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठ्या पर्यटनाचे योग. थोरामोठ्यांच्या ओळखीतून नोकरीचा लाभ. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी दुखापती सांभाळाव्यात.

नोकरीतल्या चिंता जातील

कन्या : चित्रा नक्षत्रास पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात शुक्रकलांचा मोठा लाभ होईल. व्यावसायिक उत्सवप्रदर्शनांतून लाभ. घरातील स्त्रीवर्गाचा भाग्योदय. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींची, ही पौर्णिमा नोकरीतील विशिष्ट चिंता घालवेल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी उत्सव-समारंभात चोरी-नुकसानीपासून सावध.

हितशत्रूंवर विजय मिळवाल

तूळ : विशिष्ट शुभसंकल्प कराच. ता. २६ ते २८ चं पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र दैवी स्पंदनांचंच राहील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्ती अतिशय भावसमृद्ध होतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतील बदलीतून लाभ. पौर्णिमेजवळ भाजणं-कापणं सांभाळा. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र प्रवासात सांभाळण्याचं.

प्रतिक्रिया देताना काळजी घ्या

वृश्चिक : पौर्णिमेजवळचं मंगळभ्रमण ग्रहयोगांतून विचित्र फलदायी होऊ शकतं. ज्येष्ठा नक्षत्रानं वादग्रस्त पार्श्वभूमीवर क्रिया-प्रतिक्रिया जपाव्यात. बाकी शुभग्रहांचा विशिष्ट योग आणि शुक्रभ्रमणाची स्थिती विशाखा आणि अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी छानच राहील. व्यावसायिक उपक्रम यशस्वी होतील. ता. २८ व २९ हे दिवस नोकरीत भाग्योदयाचे.

उत्सव समारंभाचा कालखंड

धनु : पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर गुरुभ्रमण सर्वंकष फलदायी होणारं. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २६ ते २८ हे दिवस फास्ट ट्रॅकसारखेच. अर्थातच गतिमान राहतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ मोठ्या उत्सव-समारंभातून नेणारा. उत्तराषाढा नक्षत्रास स्त्रीकडून लाभ. प्रेमप्रकरण मार्गी लागेल. विवाहाचा मुहूर्त ठरवाल.

व्यावसायिक लाभ मिळतील

मकर : पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात शुभग्रहांचं अधिराज्य राहील. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट सुवार्तांनी गजबजलेलाच राहील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती परिस्थितीजन्य लाभ उठवतील. व्यावसायिक आणि राजकीय लाभ. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २७ व २८ हे दिवस गुरुकृपेचेच. नवपरिणितांचे भाग्योदय. देवदर्शन शक्य.

परदेशात भाग्य उजळेल

कुंभ : पौर्णिमेजवळील रवी-गुरु शुभयोग. दैवी प्रचिती देईलच. नव्या ओळखींतून लाभ. एखादी ग्रासलेली पुत्रचिंता जाईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना वसुलीतून लाभ. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना नाताळ कला, छंद माध्यमांतून वलयांकित करणारा. परदेशात भाग्योदय. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी पौर्णिमेजवळ बाचाबाची टाळावी.

सरकारी धोरणाचा फायदा होईल

मीन : आपली गुरुची रास सप्ताहात नाताळ आणि दत्तजयंती साजरी करेल. साडेसातीतही मानसिक पर्यावरण शुद्ध राहील. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींची भावस्पंदनं प्रभावी राहतील. नोकरीतील पर्यावरण अतिशय छान राहील. लाभ करून घ्या. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी धोरणातून लाभ. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना तीर्थाटनाची संधी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com