साप्ताहिक राशिभविष्य (२४ जुलै २०२२ ते ३० जुलै २०२२)
धनवर्षाव होईल
मेष : राशीतील मंगळ, हर्षल आणि राहू यांचं एक उच्चदाबाचं केंद्र अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात राहील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट सहवासातील माणसांच्या उपद्रवाचा. गैरसमजातून वाद. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना भातृविरोध. बाकी कलाकारांना सप्ताहारंभ प्रसिद्धियोगाचा. उद्याचा सोमवार धनवर्षावाचा.
गुरूचं पाठबळ राहील
वृषभ : सप्ताहाची सुरुवात रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना अनेक प्रकारांतून लाभ देणारी. तरुणांच्या मुलाखती यशस्वी होतील. ता. २६ व २७ हे दिवस शुभ घटनांतून नावीन्यपूर्णच. २९ चा शुक्रवार तरुणांना छानच. आपल्या राशीला अमावास्येच्या प्रभावातही गुरूचं पाठबळ राहील. मात्र, शनिवारी भांडणं टाळा.
भाग्यबीजं पेरली जातील
मिथुन : राशीचं शुक्रभ्रमण स्वतंत्रपणे बोलेल. शिवाय, गुरुभ्रमणाची स्पंदनं आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना खेचून घेता येतील. ता. २५ व २६ हे दिवस निश्चितच भाग्यबीजं पेरतील. मात्र, धारदार उपकरणांपासून जपा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्या खर्चाची. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट वेदनायुक्त व्याधींतून शनिवार त्रासाचा.
दैवी प्रचिती येईल
कर्क : राशीतील अमावास्या वैशिष्ट्यपूर्णच. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येजवळ गुरुभ्रमणाची स्पंदनं खेचून घेता येतील. तरुणांना स्पर्धात्मक यश. मात्र रस्त्यावर जपा. घरी वा दारी दुष्टोत्तरं नकोत. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्या दैवी प्रचितीची. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींनी मंगळवारी आणि शनिवारी डोकं शांत ठेवा. वृद्धांशी भांडणं नकोत.
परदेशी व्यापारातून लाभ
सिंह : अमावास्येजवळ घरातील मानसिक पर्यावरण बिघडू शकतं. नवपरिणितांनी घरात शांत राहावं. बाकी ता. २४ ते २७ हे दिवस स्वतंत्र व्यावसायिकांना छानच, मात्र कामगार जपा. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशी व्यापारातून लाभ. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येचं प्रभावक्षेत्र घरातील तरुणांकडून मनस्तापाचं. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारी जागरण.
कर्ज मंजूर होईल
कन्या : अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात राशीतील अष्टम स्थानातील ग्रहांचा एक उच्चदाब क्रियाशील राहील. कोणाला धक्का लागणार नाही असंच चाला! बाकी गुरूचं कृपाछत्र पावसाळ्यात निभावून नेईल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रभ्रमणाची ऊब मिळेल. व्यावसायिकांची कर्जमंजुरी. स्त्रीकडून सहकार्य. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी लहान मुलं जपावीत.
उत्तम व्यावसायिक घडामोडी होतील
तूळ : अमावास्येचा सप्ताह कुरापती काढणारा. वाहनं सांभाळा. घरातील तरुणांची मानसिकता जपा. बाकी ता. २५ ते २७ हे दिवस एकूणच व्यावसायिक उत्तम घडामोडींचे. काहींना सरकारी साह्य. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ओळखी-मध्यस्थीतून नोकरी. विशाखा नक्षत्रास शनिवार गुप्तचिंतेचा. कोणाच्या दहशतीचा त्रास.
सार्वजनिक जीवनात जपा
वृश्चिक : अमावास्येजवळ ग्रहयोगांचा उच्चदाब राहील. सार्वजनिक जीवनात जपा. शेजारीपाजारी शांत राहा. स्त्रीशी संशयाने वागू नका. बाकी अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येजवळ दैवी प्रचिती. पुत्रोत्कर्ष. ता. २४ व २५ हे दिवस मोठ्या सुवार्तांची पार्श्वभूमी ठेवतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार दुखापतीचा.
शैक्षणिक चिंता जातील
धनू : सप्ताह गुरू-शुक्राच्या विशिष्ट स्थितीतून आपला प्रभाव वाढवेल. मात्र, सप्ताहात आरोग्यविषयक पथ्यं पाळा. ता. २५ ते २७ हे दिवस तरुणांच्या बाबतीत चमत्कार घडवतील, शैक्षणिक चिंता जाईल. मात्र, प्रेमरोग लावून घेऊ नका. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार मोठ्या सुवार्तेचा. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार खर्चाचा.
सरकारी यंत्रणांकडून लाभ
मकर : अमावास्येचा सप्ताह द्वाड तरुणांना खराबच. कुसंगत, कुपथ्यं आणि व्यसनी मित्रांपासून दूर राहा. नवपरिणीत तरुणींनी सासूरवास सांभाळावा. बाकी सप्ताह स्वतंत्र व्यावसायिकांना उत्तमच. श्रवण नक्षत्र लाभ उठवेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी यंत्रणांतून लाभ. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना यंत्र, वाहनं आणि कामगार इत्यादींतून त्रास.
व्याधी-दुखापतींपासून जपा
कुंभ : सप्ताहात संसर्गजन्य व्याधींपासून सांभाळा. हातापायाच्या दुखापती सांभाळाच. रस्त्यावरील दुर्घटना सांभाळा. बाकी शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना गुरू-शुक्राची विशिष्ट स्थिती कौटुंबिक त्रासातून सोडवेल. मात्र, अमावास्येजवळ चोरी-नुकसानी सांभाळा. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी समारंभात जपावं.
नवीन वास्तू खरेदीचा योग
मीन : सध्या राशीचा गुरू सेनापतिपद भूषवत आहेच, त्यात शुक्रभ्रमण आपलं भावविश्व छान जपत आहे. ता. २४ ते २६ हे दिवस मोठ्या सुवार्तांच्या प्रभावात ठेवतील. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना परिस्थितिजन्य मोठे लाभ. नूतन वास्तू खरेदी पार पडेल. रेवती नक्षत्राच्या तरुणांनी अमावास्येजवळ वाहनं सांभाळावी. मित्रांशी भांडणं नकोत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.