

weekly horoscope 24th may 2026 to 30th may 2026
यशाने शत्रूंना जरब बसेल
मेष : राशीतील मंगळभ्रमण होतकरू तरुणांना जीवनात खऱ्या अर्थाने मार्गस्थ करणारे. अश्विनी नक्षत्राच्या तरुणांनी आपली ऑनलाइन कनेक्टिव्हिटी सतत ठेवावी. शिक्षण, नोकरी आणि विवाह या त्रिघटकांतून प्युअर सिक्वेन्स लागतील. ता. २७ च्या कमला एकादशीचा बुधवार जीवनकमळ फुलवणाराच ठरेल. सप्ताहाचा शेवट एकूणच आपल्या राशीस छान सुखनिद्रा देईल. भरणी नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहात अतिशय अनुभवसंपन्न होणार आहे. घरातील वडीलधाऱ्या मंडळींना अतिशय प्रसन्न ठेवणार आहात. ता. २९ चा शुक्रवार अनेक माध्यमातून आपणास जगापुढे सादर करून देणारा ठरेल. विवाहविषयक गाठीभेटींतूनही प्रभाव टाकाल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना शत्रू घाबरतील. अर्थातच त्यांच्या विशिष्ट यशाने शत्रूंना जरब बसेल. सप्ताहात वैवाहिक जीवनात मोठ्या आदराने संबोधले जाईल.