

weekly horoscope 25th january 2026 to 31st january 2026
सरकारी कामात यश येईल
मेष : सप्ताह मोठा प्रवाही राहील. महत्त्वाच्या कामांना चांगलाच वेग येईल. होतकरू तरुणांना सप्ताह नोकरीत निश्चितच मार्गस्थ करणारा. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट कर्तृत्वाला वाव देणाराच. नव्या ओळखी फलद्रूप करणारा सप्ताह. ओळखींतून विवाहस्थळे येतील. सप्ताहाची सांगता विजयोत्सवानेच होईल. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार सरकारी कामांतून फलदायी होईल. विशिष्ट कोर्टप्रकरणाचे गांभीर्य जाईल. काहींना तडजोडीतून लाभ. काहींची बँकांची कर्जे मंजूर होतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २८ व २९ हे दिवस शुभग्रहांच्या उत्तम साथीचे. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. शत्रुत्वावर मात कराल. सप्ताहाचा शेवट देवदर्शनांतून भावोत्कट राहील.