

weekly horoscope 25th october 2026 to 31st october 2026
परदेशात संधी मिळतील
मेष : सप्ताहाच्या राशींच्या एक्स्चेंजमध्ये व्यवहारांतून प्रभावी ठरणारी रास राहील. विशिष्ट व्यावसायिक उत्तम संबंध जोडले जातील. मोठी भाग्यबीजे पेरली जातीलच. सतत कार्यरत राहा. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह निश्चितच ऊर्जा देणारा. आजच्या रात्रीच्या कोजागरी पौर्णिमेचा मुहूर्त साधत छान स्वप्नपूर्तीचा आनंद घेणार आहात. ता. २५ ते २७ हे दिवस आपल्य राशीस गतिमानच राहील. सप्ताहात कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सतत वाव मिळत राहील. मात्र कोणत्याही राजकारणात पडू नका. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशी संधी मिळतील.