

weekly horoscope 26th april 2026 to 2nd may 2026
सरकारी कामात साथ मिळेल
मेष : सप्ताहातील ग्रहमान संमिश्र स्वरूपातून फलद्रुप होणारे. वृद्धांनी दुखापतींपासून जपावं. काहींना वेदनायुक्त व्याधी सतावतील. प्रवासात काळजी घेण्याचाच सप्ताह वाटतो. ता. २९ चा बुधवार भांडणाचे प्रसंग आणेल, अर्थातच घरी आणि दारी. बाकी सप्ताहाचा आरंभ आणि शेवट शुभग्रहांच्या ताब्यातला. व्यावसायिक क्षेत्रात अचानक धनलाभ प्रसन्न ठेवतील. ता. २७ व २८ हे दिवस एकूणच आपल्या राशीस मोठे आश्वासक राहतील. कर्जमंजुरीतून वास्तुखरेदी मार्गस्थ होईल. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात उद्याची मोहिनी एकादशी वैवाहिक जीवनात सुवार्तांतून स्पंदनशील राहील. पती-पत्नींचे गोड संवाद होतीलच. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १ आणि २ हे पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र उंच उंच भरारी घेत मोठीच प्रगती पथावर नेईल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी कामांतून साथ देणारेच ग्रहमान आहे. मात्र भावंडांशी वाद नकोतच.