weekly horoscope 26th march 2023 to 1st april 2023
weekly horoscope 26th march 2023 to 1st april 2023sakal

साप्ताहिक राशिभविष्य (२६ मार्च २०२३ ते १ एप्रिल २०२३)

परंपरेने आलेला आत्मज्ञानाचा ठेवा हा गुरुपुष्यामृताचा असतो! अर्थातच, परंपरेचं पोषण म्हणजेच गुरुपुष्यामृत होय! मुहूर्त हा परंपराच जपतो.

वैवाहिक जीवनात आनंद

मेष : भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ गाठीभेटी, प्रवास व विशिष्ट उत्सव-समारंभातून छानच प्रवाही राहील. मुलाबाळांची कार्यं ठरतील. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २८ चा मंगळवार यंत्रं, वाहनं व जोखमीची कामं आदींमधून जपण्याचा. बाकी सप्ताहाचा शेवट एकूणच आपल्या राशीस वैयक्तिक सुवार्तांचा. वैवाहिक जीवनात आनंद.

मुलाखतींमध्ये प्रभाव पडेल

वृषभ : सप्ताह बुध-गुरू सहयोगातून तरुणांची उमेद निश्‍चितच वाढवेल. नोकरीच्या मुलाखतींतून प्रभाव टाकाल. रोहिणी आणि मृग नक्षत्राच्या व्यक्तींना शुभग्रहांचंच फिल्ड राहील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना श्रीरामनवमीचा गुरुपुष्यामृत योग दैवी प्रचितीचा. मात्र मंगळवार संसर्गाचा, पथ्यं पाळा.

जे ठरवाल ते होईल

मिथुन : राशींच्या एक्‍स्चेंजमध्ये आपल्या शेअरचा भाव चांगलाच वधारेल. श्रीरामनवमीचा गुरुपुष्यामृत सर्वार्थाने बोलेल. म्हणाल ते होईल. मंत्रालयातून कनेक्‍टिव्हिटी साधाल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सर्वत्र मोकळं मैदान राहील, ठोका चौकार-षटकार. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहातील गुरुपुष्यामृताची श्रीरामनवमी सुवार्तांतून हृद्य राहील.

कलाकारांचा भाग्योदय

कर्क : सप्ताहात भाग्यातील गुरुभ्रमणाचं अधिराज्य राहील. श्रीराम नवमीच्या दिवशीचं गुरुपुष्यामृत एक पर्वणी राहील. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट मानमरातब मिळतील. कलाकारांचे मोठे भाग्योदय होतील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींचे नूतन वास्तू प्रवेश शक्य. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींची तीर्थाटनं घडतील. मात्र, प्रवासात लहान मुलांना सांभाळा.

परदेशगमनाची संधी

सिंह : शुक्र-हर्षल युतीयोगाचं पॅकेज उत्तम राहील. व्यावसायिक औदासीन्य जाईल. प्राप्तीत विलक्षण वाढ. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना कोर्ट प्रकरणातून यश, वास्तुविषयक कटकटी जातील. पूर्वा नक्षत्रास ता. २९ ची श्रीरामनवमी मोठी भाग्यसूचक, विशिष्ट सरकारी कामं होतील, घरात मंगलकार्यं ठरतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमनाच्या संधी.

स्पर्धात्मक पातळीवर यश मिळेल

कन्या : सप्ताहातील गुरू-बुध सहयोग विशिष्ट शोभायात्राच काढणारा. अर्थातच, सतत शुभघटनांतून फ्लॅश न्यूजमध्ये राहाल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताह म्हणजे एक यशस्वी सप्तपदी राहील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २८ ते ३० हे दिवस सहकुटुंब मौजमजेचेच, तरुणांना स्पर्धात्मक यश. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी नोकरीत क्रिया-प्रतिक्रिया सांभाळाव्यात.

जीवन सार्थकी लागण्याचा काळ

तूळ : सप्ताहातील शुक्र-हर्षल युतीयोगाचं फिल्ड मोठी विलक्षण अशी फळं देईल. व्यावसायिक उत्सव, प्रदर्शनं गाजतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना श्रीरामनवमीचं गुरुपुष्यामृत जीवन सार्थकी लावेल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींची विशिष्ट खंत किंवा हृदयशल्य निघून जाईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना मंगळवार राजकीय किंवा सार्वजनिक जीवनातून सांभाळण्याचा.

उपक्रमांतून मोठं ग्लॅमर लाभेल

वृश्‍चिक : सप्ताह श्रद्धावंतांना निश्‍चितच प्रचिती देणारा. विशिष्ट कोर्ट प्रकरणातून नैतिक विजय मिळेल. वास्तुविषयक कटकटी संपतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींचा कामगारप्रश्‍न सुटेल, व्यावसायिक येणी वसूल होतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना कला, छंद वा इतर बौद्धिक उपक्रमांतून मोठं ग्लॅमर प्राप्त होईल.

संसारातल्या चिंता जातील

धनू : सप्ताहात श्रीरामनवमीची शोभायात्रा किंवा एक प्रकारचा विजयरथच दौडेल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना नैतिक विजय मिळेल. पती वा पत्नीची चिंता जाईल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना श्रीरामनवमीचा गुरुपुष्यामृत योग गुरुकृपेचं वैभव प्राप्त करून देईल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात या सप्ताहात प्रबळ वास्तुयोग आणि पुत्रयोग.

ओळखीतून करार-मदार होतील

मकर : सप्ताहातील श्रीरामनवमीजवळ शुभग्रहांचीच मांदियाळी राहील. सप्ताह शुभकार्यातूनच पल्लवित करणारा. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना दैवी स्पंदनांचा लाभ घडेल. ओळखी, मध्यस्थींतून मोठे करारमदार होतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींची व्यावसायिक वसुली होईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ३१ चा शुक्रवार सुवार्तांतून सहकुटुंब मौजमजेचा.

ध्येयं साकार होतील

कुंभ : सप्ताहातील शुक्र-हर्षल युतीयोगाची स्पंदनं आपणास सदर अशा नवकल्पनांतून ऊर्जा देणारी, त्यामुळेच आपल्या अंतःकरणाचे अँटिने सप्ताहात सतत जागृत ठेवा. शततारका नक्षत्राच्या तरुणांची ध्येयं साकारतील आणि ते रामनवमीचा उत्सव साजरा करतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती साडेसातीतही मृदू हास्य करतील आणि प्रेमात पडतील. छान मार्केटिंग होईल.

भावनिक उद्रेक टाळा

मीन : सप्ताह साडेसातीची पार्श्‍वभूमी अजिबात जाणवू देणार नाही. शुभग्रहांच्या युतीयोगातून छान स्पंदनं सोडणारा. श्रीरामनवमीचा सप्ताह राहील, फक्त भावनोद्रेक सांभाळा. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट विलक्षणच राहील. आजूबाजूचं मानसिक पर्यावरण छानच राहील. रेवती नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहातील गुरुपुष्यामृताचा उत्तम सोहळा साजरा करतील. हे एप्रिल फूल नव्हे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com