

आरोग्याची काळजी घ्या
मेष : या सप्ताहात जुनाट व्याधींतून त्रास होऊ शकतो. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींनी आहारविहारादि पथ्ये आवर्जून पाळावीतच. वाहने सांभाळावीत. घरातील मौल्यवान वस्तूंची काटेकोर काळजी घ्या. बाकी शुक्रभ्रमण घरातील कार्यांतून उत्तम साथ देईल. घरात तरुणांचे विवाह ठरतील. सप्ताहाचा शेवट घरात भावरम्य राहीलच. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट वैवाहिक जीवनातून विशिष्ट सुवार्तांतून प्रसन्न ठेवेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात शत्रुत्वाच्या पार्श्वभूमीवर वर्तन संयमी ठेवावे.