

weekly horoscope 27th september 2026 to 3rd october 2026
नोकरीच्या मुलाखतीत यश
मेष : सप्ताहातील शुभ ग्रहांचे पॅकेज तरुणांना उत्तम फलदायीच होईल. पितृ पंधरवड्यातही उत्तम विवाहस्थळे येतील. सकारात्मक राहा. सप्ताहाचा शेवट मोठा गोड राहील. मात्र सप्ताहात जुगार टाळा. वाहने जपून चालवा. धावपळीचा प्रवास टाळा. ता. २९ ची अंगारकी वैवाहिक जीवनात प्रचितीच देईल. शनिवारची अष्टमी महत्त्वाच्या गाठीभेटी यशस्वी करेलच. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना एकूणच सप्ताह मोठी ऊर्जा देईल. विशिष्ट वैयक्तिक उपक्रम उत्तम यशस्वी कराल. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट नोकरीच्या मुलाखती यशस्वी करेल.