साप्ताहिक राशिभविष्य : (२९ डिसेंबर २०२४ ते ४ जानेवारी २०२५)
स्पर्धात्मक यश, पगारवाढ मिळेल
मेष : सप्ताहातील अमावस्येच्या पार्श्वभूमीवर वक्री मंगळाची दखल घ्यावीच लागेल. जमिनीवरच राहा, कोणताही खोटा आवेश नकोच. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींनी नोकरी व्यावसायिक हितशत्रू जपावेत. बाकी सप्ताहातील गुरुभ्रमणाची कनेक्टिव्हिटी भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना नववर्षाच्या आरंभी मोठे भाग्यसंकेत देईल. तरुणांना कॅम्पसमधून नोकऱ्या मिळतील. कृत्तिका नक्षत्र व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट विचित्र चोरी किंवा नुकसानीचा.
कलावंतांचा मोठा भाग्योदय
वृषभ : ता. ३० व ३१ डिसेंबर हे दिवस प्रवासात वा पर्यटनक्षेत्री जपण्याचे. उन्माद टाळा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी दुखापती सांभाळाव्यात. घरातील हट्टी स्त्रीवर्ग जपा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना आचारसंहिता पाळावी लागेल. बाकी राशीतील गुरुभ्रमण नववर्षारंभी जीवनरथ वेग घेणारच आहे. कलावंतांचे मोठे भाग्योदय. कृत्तिका नक्षत्रांच्या व्यक्तींचा परदेशी भाग्योदय. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्ती नववर्षारंभी आपल्या उपक्रमातून सेलिब्रेटीच होतील. उत्तम विवाहस्थळे येतील. पाठपुरावा कराच.
नवा व्यावसायिक पर्याय मिळेल
मिथुन : सप्ताहारंभी खर्चाचे प्रसंग शक्य. घरगुती उपकरणं बिघडतील. विद्युत उपकरणं जपून हाताळा. बाकी सप्ताहात मृग नक्षत्राच्या शेवटी वैवाहिक जीवनातून सुवार्तेचा. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट विशिष्ट परिस्थितीजन्य लाभ देईल. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना नव्या व्यावसायिक पर्यायातून लाभ होतील. सरकारी कामातून यश मिळेल. ता. ३ चा शुक्रवार गाठीभेटीतून भाग्यबीजं पेरणारा. मोठे चैनीचे प्रसंग येतील.
परदेशात भाग्योदय होईल
कर्क : अमावस्येचं प्रभावक्षेत्र संमिश्र स्वरूपाची फळं देईल. आश्लेषा व्यक्तींनी अन्नपाण्यातील संसर्गापासून जपावं. कुपथ्यं टाळावीत. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींनी उष्णताजन्य विकारापांसून सावधगिरी बाळगावी. बाकी नववर्षारंभ गुरुकृपेचाच राहील. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना नववर्षारंभ अकल्पित भाग्योदयाचा. काहींचा परदेशी भाग्योदयाचा. ता. ४ चा शनिवार एकूणच आपल्या राशीस अनेक बाबतीत बेरंग करणारा ठरू शकतो. विचित्र खर्चाचे प्रसंग. रात्री जागरणाचे प्रसंग येतील.
नोकरीत व्यवसायात अनुकूलता
सिंह : सप्ताहात प्रारंभीचं अमावस्येचं प्रभावक्षेत्र अपवादात्मक परिस्थितीतून नेऊ शकतं. प्रवासात अडथळे येतील. मित्रसंगतीबाबत विचित्र अनुभव येतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना विचित्र खर्चाचे प्रसंग अस्वस्थ करतील. घरातील कोणाची आरोग्य चिंता सतावेल. बाकी गुरुभ्रमणाच्या कनेक्टिव्हिटीतून नववर्षारंभ नोकरी-व्यावसायिक पार्श्वभूमीवर शुक्रभ्रणातून वैवाहिक जीवनातून सुगंधित लहरी येतील. शुक्रवार चैनीचा, प्रेमिकांचे स्वरानुसंधान करत गीत गाता चल करणारा.
प्रिय व्यक्तींबद्दल सुवार्ता मिळतील
कन्या : अमावस्येच्या प्रभावात सुरू होणारा सप्ताह वक्री मंगळाचं व्होल्टेज वाढवू शकतो. ता. २९ व ३० हे दिवस क्रिया-प्रतिक्रियांतून जपण्याचे. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना मानवी उपद्रवाचे ठरू शकतात. बाकी नववर्षारंभ आपल्या राशीस उत्तम भावस्पंदनातून नेणारा. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २ व ३ हे दिवस प्रिय व्यक्तींच्या सुवार्तातून आनंद साजरा करणारे. तरुणांना विशिष्ट शैक्षणिक यशातून चांगले परिणाम दाखवतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट गाठी-भेटींमधून बेरंग करणारा ठरू शकतो.
राजकीय व्यक्तींनी काळजी घ्यावी
तूळ : वक्री मंगळाच्या फिल्डवर होणारी अमावस्या प्रदूषणाचीच. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींचा सूर बिघडवू शकते. नोकरी-व्यावसायिक क्षेत्र मानवी उपद्रव वातावरण प्रदूषित करेल. घरात मातृपितृ चिंता शक्य. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना नववर्षारंभ उत्सव समारंभात बेरंग करू शकतो. राजकीय व्यक्तींनी सांभाळलेच पाहिजे. तरुणांनी व्यसनी मित्रांची संगत टाळावीच. विशाखा नक्षत्रास सप्ताहाचा शेवट दगदगीचा. घरात वादाचे प्रसंग घडतील. जागरण घडेल.
नववर्षारंभ झगमगाटी राहील
वृश्चिक : सप्ताहारंभी अमावस्येचा प्रभाव जाणवेल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार घरातील वृद्धांच्या चिंतेचा ठरू शकतो. बाकी नववर्षारंभ आपल्या राशीस झगमगाटीच राहील. अनुराधा नक्षत्रास ता. २ व ३ हे दिवस अतिशय गतिमान राहतील. नोकरीत भाग्योदय होईल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग. सप्ताहात पती वा पत्नीचा भाग्योदय, नववर्षाचा विषय राहील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी तिन्हीसांजसमयी भांडणे टाळावीत. मित्रांशी सांभाळावे.
चकित करणारा धनवर्षाव शक्य
धनू : सप्ताहात अमावस्येचा प्रभाव. वक्री मंगळाचं हाय व्होल्टेज राहील. ता. ३०, ३१ आणि १ हे दिवस विचित्र स्फोटक फळे देऊ शकतात. प्रवासात सांभाळा. वागण्या-बोलण्यातील तोल सांभाळा. अमावस्या राजकीय व्यक्तींना घातक ठरू शकते. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्ती लक्ष्य होऊ शकतात. बाकी मूळ नक्षत्रास सप्ताहाचा शेवट विशिष्ट व्यावसायिक धनवर्षावातून चकित करतील. उत्तराषाढा व्यक्तींना शनिवार विचित्र जागरणाचा ठरू शकेल.
कुसंगत टाळा-संताप आवरावा
मकर : सप्ताहातील वक्री मंगळाच्या हाय व्होल्टेजमध्येही धीर धरून लाभ करून घेणारी रास राहील. अमावस्येजवळ तरुणांनी कुसंगत टाळावी. व्यसनी मित्रांची संगत टाळा. बाकी सप्ताहात श्रवण नक्षत्राच्या व्यक्ती नववर्षारंभ मोठ्या झोतात साजरा करतील. नववर्षाचे ता. १, २ आणि ३ हे दिवस दुपटी, तिपटीने अर्थातच चढत्या क्रमाने उत्तम फलदायी होतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहाच्या शेवटी घरात संताप आवरावा. विशेषतः नवपरिणितांनी जपलंच पाहिजे.
तरुणांना अनुकूल कालखंड
कुंभ : सप्ताहात राशीत झालेलं शुक्राचं पदार्पण आपली स्पंदनं जाणवून देतच राहील. नववर्षारंभाचा सप्ताह शुभग्रहांची रसद पुरवतच राहील. मात्र वक्री मंगळाचे शॉर्टकट्सचे भान सप्ताहात ठेवलेच पाहिजे. शततारका नक्षत्रास गुरुभ्रमण सप्ताहारंभी संरक्षक राहीलच. ता. २ व ३ हे दिवस घरात तरुणांच्या भाग्योदयातून चांगले परिणाम दाखवतील. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहाच्या आरंभी आणि शेवटी सार्वजनिक जीवनातून सांभाळावे. गावगुंडाशी वाद नकोत.
शेअरबाजारात काळजी घ्यावी
मीन : अमावस्येच्या प्रभावात सुरू होणारा सप्ताह नोकरीतील कामाचा ताण वाढवणाराच. नोकरीतील वरिष्ठांशी वादविवाद नकोच. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींनी सांभाळलेच पाहिजे. बाकी नववर्षारंभ सहकुटुंब चैन-करमणुकीचेच राहील. ता. २ व ३ हे दिवस व्यावसायिक उत्सव, प्रदर्शने गाजवणारेच ठरतील. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात मित्रमंडळींच्या कुसंगतीपासून किंवा व्रात्यपणापासून जपलंच पाहिजे. शेअर बाजारात सांभाळा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.