weekly horoscope 29th october 2023 to 4th november 2023
weekly horoscope 29th october 2023 to 4th november 2023Sakal

साप्ताहिक राशिभविष्य (२९ ऑक्टोबर २०२३ ते ४ नोव्हेंबर २०२३)

चंद्र, स्त्री आणि मन यांचा परस्परसंबंध फार पूर्वांपार जोडला जात आला आहे. स्त्री ही आपल्या मनानं आपल्या पतीला वरते.
Published on

उष्णताजन्य विकारांपासून सावध

मेष : मंगळ-बुध सहयोगाच्या पार्श्वभूमीवर सप्ताह सर्व पातळीवर आचारसंहिता पाळायला लावणारा. उष्णताजन्य विकारांपासून सावध. व्यसने, विशिष्ट कुसंगत इत्यादींतून अडचणीत आणणारे ग्रहमान. बाकी भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रभ्रमण आणि गुरुभ्रमणाची साथ, प्रामाणिक प्रयत्नांना यशच देईल. पुत्रोत्कर्षातून धन्यता.

तरुणांचा भाग्योदय होईल

वृषभ : सप्ताहात काम, क्रोध आणि लोभ याला आवर घालाच. सप्ताहारंभी कोणताही जुगार टाळा. बाकी सप्ताह घरातील तरुणांचा भाग्योदयच करेल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ३१ ते ३ हे दिवस घरगुती आघाडीवर प्रसन्नच ठेवतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ३ नोव्हेंबरचा शुक्रवार मोठा भावरम्य.

उन्माद टाळा, संमिश्र कालखंड

मिथुन : सप्ताह तारुण्याच्या उंबरठ्यावरील तरुणांना थोडा परस्परविरोधी फळे देऊ शकतो. कोणताही उन्माद टाळा. बाकी आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत भाग्योदय चकित करेल. ता. १ ते ३ हे दिवस शुभ ग्रहांच्या उत्तम साथसंगतीचे. थोरामोठ्यांच्या सहकार्यातून कामे होतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार मोठा प्रसन्न जाईल.

सावध राहा, वाहनांपासून जपा

कर्क : आजचा ग्रहणाचा करिदिन, मंगळ-बुध युतीयोगातून हाय व्होल्टेजचा. वाहने सांभाळा. गृहिणींनी भाजणं, कापणं यांपासून सांभाळावं. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींनी सतत अवधान ठेवावं. बाकी शुक्रभ्रमण, व्हिटॅमिन एमचा अर्थातच व्यावसायिक अर्थपुरवठा करेल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहाचा आरंभ आणि शेवट विशिष्ट मानसन्मानाचा.

आजार-शस्त्रक्रियेमुळे चिंता

सिंह : सप्ताहातील भाग्यातील गुरुभ्रमण सर्वस्वी शुभ फळे देईल. तरुणांना नोकरीविषयक उत्तम संधी येतील. परदेशस्थ तरुणांचे एक सुंदर पर्व सुरू होईल. सप्ताहाचा शेवट स्तंभी शनीच्या पार्श्वभूमीवर घरात कोणाच्या आजार, शस्त्रक्रियेतून चिंता निर्माण करू शकतो. बाकी पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींचे बॅटिंग फिल्डच राहील. मात्र मित्रांशी भांडू नका.

विशिष्ट येणी वसूल होतील

कन्या : आजचा ग्रहणाचा करिदिन, मोठ्या हाय व्होल्टेजचा. कोणतीही अरेरावी नको. प्रवासात जपा. गावगुंडांपासून सावध. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींचे एक प्रकारचे १४४ कलमच लागू राहील. बाकी सप्ताह विशिष्ट येणी वसूल करेल. बेरोजगारांना गुरुवार, शुक्रवार दैवी प्रचितीचे. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात हरवलेलं गवसेल.

नोकरीत मोठे लाभ होतील

तूळ : वादग्रस्त पार्श्वभूमीवर सप्ताह विशिष्ट लक्षणे दाखवेल. अर्थातच वाद चिघळू देऊ नका. शुभ ग्रहांची मंत्रालये आपणास गुप्तपणे साह्य करतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना विशेषतः नवपरिणितांनी सप्ताहात आचारसंहिता पाळावीच. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार आणि शुक्रवार वैयक्तिक विजयोत्सवाचेच. नोकरीत मोठे लाभ.

नुकसानभरपाई मिळेल

वृश्चिक : आजचा रविवार अन्नपाण्यातील संसर्गापासून जपण्याचा. प्रवासात बाचाबाची नको. बाकी शुक्रभ्रमण ज्येष्ठा नक्षत्रास ता. ३१ व १ या दिवसांत गाठीभेटींतून उत्तम साथ देईल. नोकरीत प्रशंसा. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार गुरुकृपेचा. पुत्रचिंता जाईल. विशिष्ट नुकसानभरपाई मिळेल.

ऐतिहासिक फळे मिळतील

धनु : सप्ताह मोठी ऐतिहासिक फळे देईल. विशिष्ट महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्ती विशिष्ट नवस फेडतील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींनी स्तंभी शनीच्या पार्श्वभूमीवर सप्ताहाचा शेवट जुनाट व्याधींच्या पार्श्वभूमीवर जपावा. कुपथ्ये टाळा. बाकी शुक्रवार घरात प्रिय व्यक्तींच्या सुवार्तांचा.

मुलाखती उत्तम होतील

मकर : मोठे परस्परविरोधी ग्रहमान राहील. मंगळ-बुध सहयोग आणि स्तंभी शनीची पार्श्वभूमी अकारण वादात गोवू शकते. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींनी दुष्ट बुद्धीच्या व्यक्तींचा संपर्क टाळावाच. बाकी गुरुभ्रमणाची लिंक मोठी पूरक राहील. तरुणांच्या नोकरीच्या उत्तम मुलाखती होतील. ता. ३१ व १ हे दिवस भाग्यबीजे पेरतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना गुंतवणुकीतून लाभ.

कला-छंदांमधून मानसन्मान

कुंभ : सप्ताह बुद्धिवंतांना छान साथ देईल. तरुणांना शैक्षणिक उत्तम मार्ग खुले होतील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट धक्कादायक यश मिळेल. स्वतंत्र व्यावसायिकांना ता. १ ते ३ हे दिवस महत्त्वाच्या कामांतून साथ देतील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना कला-छंद इत्यादी माध्यमातून मानसन्मान. मात्र शनिवारी पाकीट जपा.

कौटुंबिक कलह सतावतील

मीन : स्तंभी शनीची पार्श्वभूमी आणि मंगळ-बुध सहयोगाचे हाय व्होल्टेज सप्ताहावर अंमल करणारे. सहवासातील मूर्खांशी संवाद नको. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना कौटुंबिक कलह सतावतील. आजचा रविवारचा ग्रहणाचा करिदिन एकूणच बेरंग करू शकतो. बाकी सप्ताहात नोकरीतील पर्यावरण उत्तम राहील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार व्यावसायिक लॉटरीचा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com