साप्ताहिक राशिभविष्य (०२ ऑक्टोबर २०२२ ते ८ ऑक्टोबर २०२२)

आपली ग्रहमाला एक घरकुल असल्यासारखीच आहे. या घरकुलामध्ये गुरू आणि शनी हे श्रेष्ठी ग्रह या घरकुलाची मर्यादा किंवा बॅलन्स सांभाळत जणू वक्री, मार्गी किंवा स्तंभी होत असतात.
Weekly Horoscope
Weekly HoroscopeSakal
Published on

वादग्रस्त गाठी-भेटी टाळा

मेष : वक्री शनी आणि हर्षल यांची कडक फिल्डिंग राहील. सर्व ठिकाणी नियम पाळा. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींनी वादग्रस्त गाठीभेटी टाळाव्यातच. बाकी अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट अतिशय गोड राहील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार खरेदी-विक्रीतून लाभाचा.

नवपरिणितांना ग्रहांची साथ

वृषभ : सप्ताहाचा छानच सूर राहील. नवपरिणितांना शुभ ग्रहांची उत्तम साथसंगत. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींच्या सप्ताहाचा आरंभ मोठा मजेदार. व्यावसायिक येणी येतील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना शैक्षणिक यश. मात्र, प्रवासात अर्थातच सीमोल्लंघन करताना सावधान. भाजणं-कापणं यापासून जपा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार भाग्योदयाचा.

नोकरीत भाग्योदय होईल

मिथुन : शुभ ग्रहांची लॉबी कार्यरत राहीलच. सप्ताहाचा आरंभ घरात आनंदोत्सवाचा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींचा नोकरीत भाग्योदय, विशिष्ट कौतुक समारंभ होईल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट व्यावसायिक चिंता घालवणारा. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना कोणतंही सीमोल्लंघन परवडणारं नाही!

स्पर्धात्मक पातळीवर यश

कर्क : कलंदर व्यक्तींना सप्ताह त्यांच्या कलागुणांना वाव देणारा. शुभ ग्रहांचा अंडरकरंट अंतःस्फूर्तीतून लाभ देईल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्ती मोठा लाभ उठवतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना स्पर्धात्मक यश. सप्ताह वैवाहिक जीवनातील सीमोल्लंघनातून अडचणीत आणणारा. नवपरिणितांनी सावध. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना स्त्रीविरोध.

मंत्रालयातली कामं होतील

सिंह : सप्ताहात वक्री ग्रहांचं सेन्सॉर राहीलच; परंतु यातही बुध-शुक्राचं उत्तम मार्केटिंग राहील. स्वतंत्र उद्योजकांना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट उत्तमच. मघा नक्षत्राच्या व्यक्तींची मंत्रालयातली कामं होतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ७ व ८ हे दिवस चमत्कार घडवतील. देवदर्शनाचा योग.

व्यावसायिक करारमदार शक्य

कन्या : सप्ताह खऱ्या अर्थाने नशीब काढणारा. नोकरीत सुखा-समाधानाचा काळ सुरू होत आहे. विवाहासाठी घाबरू नका; परंतु मोहात पडू नका! सीमोल्लंघन जपा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट दमदार फलंदाजीचा, व्यावसायिक करारमदार होतील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीचे कॉल येतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रविरोध.

नियम पाळा - चौकट मोडू नका

तूळ : वक्री ग्रहांचं एक पॅकेज सध्या अस्तित्वात आहे. अर्थात, त्यांचं एक सेन्सॉर राहील. थोडक्यात, नैसर्गिक नियम पाळा आणि चौकटीतच राहा. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी ता. ४ व ५ हे दिवस सांभाळूनच. स्वाती नक्षत्राच्या तरुणांना सप्ताहाचा आरंभ विशिष्ट सुवार्तांतून प्रसन्न ठेवेल.

व्यवसायात झेप घ्याल

वृश्चिक : सप्ताहात आपलं व्यक्तिमत्त्व खुलणारच आहे. विवाहेच्छूंना सप्ताह छानच. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट झगमगाटीचा! व्यावसायिक झेप घ्याल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना पर्यटनांतून आनंद. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी कागदोपत्रीचे व्यवहार जपावेत. सीमोल्लंघनाजवळ दुखापतीपासून जपा.

चातुर्यातून लाभ होईल

धनू : शुभ ग्रहांचं विशिष्ट पॅकेज क्रियाशील राहीलच; दुरुत्तरं टाळा. दसऱ्याजवळ यंत्र, वाहन यांपासून जपा. बाकी मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट चातुर्यातून लाभ देणारा. गाठीभेटी यशस्वी होतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सहचरी भेटेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना दंतव्यथेचा त्रास.

गुरुकृपेचा वर्षाव राहील

मकर : वक्री ग्रहांची जरा कडक फिल्डिंग राहील. आपल्या राशीत होणाऱ्या सीमोल्लंघनाजवळ जपाच. विशेषतः धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती बाकी शुभ ग्रहांचा सूर सप्ताहाच्या आरंभी आणि शेवटी पकडू शकता. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना प्रेमळ माणसं भेटतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींवर सप्ताहातील रविवार आणि शनिवार गुरुकृपेचाच वर्षाव करणारा.

व्यवसायातली वसुली होईल

कुंभ : वक्री ग्रहांची मोठी हाय टेन्शन वायर सप्ताहावर राहील. नैसर्गिक दुर्घटना होऊ शकतात. ता. ४ व ५ ऑक्टोबर हे दिवस प्रवासात, वाहतुकीत सांभाळण्याचेच. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी सांभाळावं. बाकी शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट व्यावसायिक लाभांतून तृप्त करणारा.

उत्तम पॅकेजच्या नोकरीची संधी

मीन : राशीतील गुरुभ्रमण आपलं आंतरविश्व प्रसन्न ठेवेल, आत्मसंवाद साधाल. हेच ते देहबुद्धीचं सीमोल्लंघन! बाकी शुभ ग्रह आपल्या सहवासातील व्यक्तींचा भाग्योदय करतील. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम पॅकेजची नोकरी. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रलाभ. अर्थातच, नवपरिणितांचे प्रश्न सुटतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com