साप्ताहिक राशिभविष्य (३० ऑगस्ट २०२६ ते ६ सप्टेंबर २०२६)

माणूस हा आपली हुकूमत किंवा सत्ता जीवनात राबवतच असतो. काही माणसं न बोलता हुकूमत गाजवत असतात.
weekly horoscope 30th august 2026 to 6th september 2026

weekly horoscope 30th august 2026 to 6th september 2026

Sakal
Published on

अतिरेक नको, नियम पाळाच

मेष : सप्ताहात शनि-मंगळ केंद्रयोगाचे एक फिल्ड राहील. सप्ताहात कोणताही नियमभंग करू नका. रस्त्यावरील अतिरेकी सांभाळा. मूर्खांशी संवाद अजिबात टाळा. बाकी सप्ताहात गुरु, शुक्र आणि बुध यांच्या ग्रहयोगांतून त्यांची लॉबी छान क्रियाशील राहील. सप्ताहाचा शेवट श्रीकृष्णाष्टमीतून छान साजरा होईल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना अचानक लाभांची परंपरा अगदी चकित करेल. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना बलवत्तर विवाहयोग आहेत. प्रेमिकांना शनिवारचा गोपाळकाला प्रेमाची स्पंदने खेचूनच घेईल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्ती बुधवार, गुरुवार विशिष्ट सुवार्तांतून चैनीवर खर्च करतील. पुत्रचिंता जाईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com