

मानसन्मानाचा कालखंड
मेष : सप्ताहातील वाढत्या चंद्रबळातून शुभग्रहांची साथ उत्तम राहील. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्ती योग्य असे महत्त्वाचे निर्णय घेतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह गुरुभ्रमणातून विशिष्ट मानसन्मान घडवेल. ता. ३१ व १ हे दिवस जीवनात रंगतसंगत आणणारेच. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी या सप्ताहात प्रवासामध्ये सांभाळावं.
रंगतदार फळं मिळतील
वृषभ : सप्ताहातील अधिकातील पौर्णिमा मोठी रंगतदार फळं देईलच. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींचा झगमगाट असेल. पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात ठिकठिकाणी आगतस्वागत. कर्जमंजुरी. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र घरात सुवार्तांचं राहील. मात्र, नोकरीत गैरसमज टाळा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र तीर्थाटनाचं.
चांगल्या नोकरीची संधी
मिथुन : सप्ताहारंभ नोकरीतील घटनांमधून प्रसन्न ठेवणारा. नोकरीत बढतीची चाहूल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना गाठीभेटी व मुलाखतींतून मोठं यश. उद्याचा सोमवार भाग्यसूचक. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी संशयास्पद आर्थिक व्यवहार टाळावेत. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ वैवाहिक जीवनातून प्रसन्न ठेवेल. उत्तम नोकरीची संधी मिळण्याची शक्यता.
सरकारी कामांना गती
कर्क : पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र शुभग्रहांच्या माध्यमातून झगमगाट करेल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना थोरामोठ्यांच्या ओळखीतून लाभ. ता. १ व २ हे दिवस सरकारी कामांतून गती घेणारे. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना प्रवासयोग. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींचा पौर्णिमेमुळे राजकीय दबदबा वाढवेल; मात्र असंगाशी संग नको.
असंगाशी संग टाळा
सिंह : सप्ताहात पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात असंगाशी संग टाळा. घरी वा दारी वागण्या-बोलण्यातील गैरसमज टाळावेत. बाकी गुरुभ्रमणाचा प्रभाव सप्ताहारंभी वाढतानाच दिसेल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशी प्रसिद्धी. मुलाबाळांच्या चिंता मिटतील. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ वैयक्तिक उत्सव-समारंभातून बोलणारा. धनचिंता जाईल.
सरकारी बहुमान मिळेल
कन्या : सप्ताहात संशयास्पद आर्थिक व्यवहार टाळाच. खरेदी-विक्रीतील संमोहनं टाळा. गर्भवतींनी काळजी घ्यावी. नोकरीतील राजकारणात पडू नका. वरिष्ठांशी गैरसमज नकोत. बाकी पौर्णिमेजवळ हस्त नक्षत्राच्या व्यक्तींची छान मौजमजा. वैवाहिक जीवन सुधारेल. पती वा पत्नीचा भाग्योदय. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी बहुमान मिळेल.
हितशत्रूंवर विजय मिळवाल
तूळ : पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात चौकार, षटकार मारणारीच रास राहील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ महत्त्वाच्या कामांतून सतत ग्रीन सिग्नल देणारा. अर्थातच प्रेमिकांनासुद्धा. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र व्यावसायिक मार्ग खुला करणारं. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात राजकीय हितशत्रूंचा त्रास, मात्र त्यावर विजय मिळवाल.
प्रवासात संसर्गापासून जपा
वृश्चिक : पौर्णिमेच्या फिल्डवर वक्री शुक्रभ्रमण विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत उत्कर्षाचं. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेजवळ नोकरीच्या उत्तम संधी येतील. सहकुटुंब मौजमजा, प्रेमाच्या आणाभाका होतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेजवळ प्रवासात संसर्गाचा धोका.
महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील
धनू : सप्ताहातील गुरू-मंगळाचा शुभयोग मोठा प्रभाव टाकणारा. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींच्या विशिष्ट महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. काहींना सरकारी माध्यमातून लाभ. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ कला वा छंद उपक्रमांतून फ्लॅश न्यूजमध्ये आणणारा. ओळखींतून विवाहयोग.
गैरसमज, वाद टाळावेत
मकर : पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र संमिश्ररीत्या फलदायी होऊ शकतं. वैवाहिक जीवनातील गैरसमजातून त्रास होऊ शकतो. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा व्यावसायिक सरकारी कामांतून फलदायी होईल. तरुणांना कलात्मक उपक्रमांतून यश देणारी. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी हुज्जती टाळाव्यात.
मानसिक त्रासाची शक्यता
कुंभ : पौर्णिमेचा सप्ताह आजूबाजूचं मानसिक पर्यावरण बिघडवू शकतो, कोणतीही मध्यस्थी टाळा. बाकी वक्री शुक्रभ्रमण तरुणांना साथ देईलच. मित्रांकडून लाभ. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात विवाहयोग. पूर्वा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचा प्रवासात बेरंग होऊ शकतो. वेंधळेपणा टाळा.
नुकसानभरपाई मिळेल
मीन : सप्ताहात उतावीळपणा टाळा. बाकी सप्ताहारंभ सामाजिक कार्यात यश देणारा. नोकरीत विशिष्ट आर्थिक लाभ वा लांबलेली पगारवाढ होईल. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट नुकसानभरपाई मिळेल किंवा विशिष्ट नुकसान भरून काढाल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार धावपळीतून नुकसानीचा ठरू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.