

विशिष्ट मनोव्यथा संपतील
मेष : सप्ताहाची सुरुवात दुर्गाष्टमीतून होत आहे. आपल्या राशीस एकूणच नक्षत्र लोकांतून लाभ होतील. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तीला थोरामोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. काहींचे नव्या घरातील श्रीगणेशाचे आगमन मोठे भाग्यसंकेतच देणारे ठरेल. ता. २ ते ४ हे दिवस आत्यंतिक प्रवाही राहतील. अर्थातच शुभग्रहांचा फास्ट ट्रॅक ठेवतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तीला विशिष्ट नवस पूर्ण करता येईल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तीला शनिवारची अनंत चतुर्दशी विशिष्ट मनोव्यथा घालवेल.