

weekly horoscope 31st may 2026 to 6th june 2026
यशस्वी झेप घ्याल
मेष : पौर्णिमेने सुरू होणारा सप्ताह छान मौजमजेचे प्रसंग आणणार आहे. घरात भावाबहिणींची कार्ये ठरून आनंद साजरा कराल. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २ ते ४ हे दिवस कला, छंद वा इतर बौद्धिक उपक्रमांतून मोठी यशस्वी झेप घेतील. सप्ताहात मित्रमैत्रिणीकडून मोठे लाभ होतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात ओळखी मध्यस्थीतून उत्तम विवाहस्थळांचा पाठपुरावा केला जाईल. सप्ताह परदेशस्थ तरुणांचे भाग्य ठरवेलच. सप्ताहातील ता. ४ जूनचा गुरुवार सुवार्तांतून कायम लक्षातच राहील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह एकूणच मोठा आत्मविश्वास वाढवेल. सप्ताहाचा शेवट मोठा हृद्य राहील. घरात तरुणांचे भाग्योदय धन्य करतील. नोकरीत पगारवाढ होईल. सरकारी माध्यमातून लाभ होतील.