साप्ताहिक राशिभविष्य : (३ मे २०२६ ते ९ मे २०२६)

सप्ताह कौटुंबिक पार्श्वभूमीवर प्रसन्न राहील. सप्ताहात घरात कार्ये ठरतील. तरुणांना सप्ताहाचा शेवट विजयोत्सवाचाच राहील.
weekly horoscope 3rd may 2026 to 9th may 2026

weekly horoscope 3rd may 2026 to 9th may 2026

Sakal
Published on

अपयश धुऊन काढाल

मेष : सप्ताह कौटुंबिक पार्श्वभूमीवर प्रसन्न राहील. सप्ताहात घरात कार्ये ठरतील. तरुणांना सप्ताहाचा शेवट विजयोत्सवाचाच राहील. काहींना स्पर्धात्मक यशातून नोकरी देणारा. भरणी नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहात भूतकाळातील अपयश धुऊनच काढतील. ता. ७ चा पंचमीचा गुरुवार याचीच प्रचिती देईल. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह नोकरीच्या मुलाखतींतून यश देणारा. व्यावसायिक जाहिरातींना उत्तम प्रतिसाद मिळेल. विशिष्ट भागीदारीचे प्रश्न सामोपचाराने सुटतील. घरातील भातृचिंता जाईल. शनिवारची अष्टमी एकूणच आपल्या राशीस महत्त्वाच्या गाठीभेटींतून फलद्रुप होणारी. विवाहेच्छूंच्या गाठीभेटी अंतिम टप्पा गाठतील. चैनी, करमणुकीचे प्रसंग येतीलच.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com