weekly horoscope 4th january 2026 to 12th january 2026
Horoscope | राशी भविष्य
साप्ताहिक राशिभविष्य : (०४ जानेवारी २०२६ ते १२ जानेवारी २०२६)
माणूस हा एक जाणिवांचा खेळ आहे आणि या पंचमहाभूतांच्या जाणिवांचा खेळ अतिशय गुंतागुंतीचा होत जात असतो. या गुंतागुंतीतून तारून नेणारीच श्रीगणेश विद्या होय.
वैवाहिक समस्या संपतील
मेष : सप्ताहातील राशींच्या एक्स्चेंजमध्ये आपल्या राशीचा भाव प्रचंड वाढणार आहे. जीवनातील मोठ्या संधी येतील. सप्ताहातील शुक्र भ्रमण इतर ग्रहांच्या योगांतून ग्रहांचा पटच ताब्यात घेईल. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना अंगारकीचा मंगळवार परदेशात तरुणांना चिंतामुक्त करणारा ठरेल. सप्ताहात भरणी नक्षत्रास संपूर्णपणे बॅटिंग फिल्ड राहील. शैक्षणिक स्पर्धात्मक यश जीवन छान मार्गस्थ करेल. मंगळाशी होणारे रवी आणि गुरु यांच्याशी होणारे योग घरी आणि बाहेरच्या जगात मोठे हृदयस्पर्शी राहतील. काहींची राजकीय वाटचाल जोरात सुरू होईल. गुरुवार आणि शुक्रवार मोठ्या दैवी प्रचितीचेच राहतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींच्या वैवाहिक समस्या निघून जातील. पती वा पत्नीचा उत्तम भाग्योदय होईल.

