

weekly horoscope 4th october 2026 to 10th october 2026 pjp78
बँकांची कर्जे मंजूर होतील
मेष : सप्ताहातील ग्रहांचे फील्ड वक्री शुक्रभ्रमण पूर्ण ताब्यात घेईल. घरगुती पार्श्वभूमीवर उत्तम भावपर्यावरण राहील. पती वा पत्नीच्या सुवार्तांचा भर राहील. ता. ६ च्या इंदिरा एकादशीचा दिवस जीवनातील विशिष्ट संकल्प पूर्ण करेल. तरुणांना सप्ताह नोकरीचे उत्तम योग आणेल. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्ती नोकरीत कर्तव्य गाजवतील. शत्रुत्वावर मात कराल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींवर सप्ताहाचा शेवट मातृपितृचिंतेचे सावट ठेवू शकतो. बाकी सप्ताहाचा आरंभ नोकरी - व्यावसायिक मोठे अनुकूल वातावरणच ठेवेल. बँकांची कर्जे मंजुरी होतील. वास्तुयोग आहेत.