साप्ताहिक राशिभविष्य : (०५ एप्रिल २०२६ ते ११ एप्रिल २०२६)

पृथ्वीवरील समुद्राची भरती-ओहोटी ही जशी रवी-चंद्राच्या स्थितीवर आंदोलित होत असते, तशीच पृथ्वीवरील मानवी भावभावनांची भरती-ओहोटी या चंद्रकलांच्या अनुषंगाने आविष्कारित होतच असते.
weekly horoscope 5th april 2026 to 11th april 2026

weekly horoscope 5th april 2026 to 11th april 2026

Sakal
Published on

व्यावसायिकांची पतप्रतिष्ठा वाढेल

मेष : सप्ताहाची सुरुवात घरात सुवार्तांचीच राहील. आजचा सूर्योदय पुत्रोत्कर्षातून धन्य करेल. सप्ताहातील राशीचे शुक्रभ्रमण अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाच्या शेवटाची शुक्रवारची अष्टमी जीवन सार्थकीच लावणारी. भरणी नक्षत्राच्या व्यक्ती एकूणच सप्ताहात बुद्धिचातुर्यातून लाभ उठवतील. तरुणवर्ग नोकरीच्या मुलाखतीतून छाप पाडेल. ता. ९ ते ११ हे दिवस प्रत्येक वनडे जिंकून देतीलच. शुक्रवारच्या अष्टमीचे प्रभावक्षेत्र स्वतंत्र व्यावसायिकांची पतप्रतिष्ठा वाढवेल. जाहिरातमाध्यमे यशस्वी होतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहाच्या शेवटी प्रवासात सर्व बाबतीत दक्षता बाळगावी. विसरभोळेपणा टाळावा. प्रवासात लहान मुले सांभाळा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com