

weekly horoscope 5th july 2026 to 11th july 2026
आचारसंहिता आवर्जून पाळा
मेष : सप्ताहात शनी, मंगळ आणि हर्षल या बहिर्ग्रहांचे योग अनेकांची मने प्रक्षुब्ध करू शकतात. वादविवादाचे प्रसंग टाळा. मूर्खांशी संवाद किंवा गाठीभेटी करूच नका. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक पातळींवरून आचारसंहिताच पाळावयास लावणारा सप्ताह. सप्ताहाचा शेवट अतिशय संमिश्र स्वरूपात फलदायी होऊ शकतो. सप्ताहाच्या आरंभी शुभ ग्रहांची कनेक्टिव्हिटी खेचून घेता येईलच. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींची प्रवासातील कामे यशस्वी होतीलच. मात्र सप्ताहात वृद्धांनी जुनाट व्याधींच्या प्रादुर्भावापासून जपावे. घरगुती वाद उकरून काढू नये. मुलाबाळांची मने जपावीत. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात विचित्र जागरणाचे प्रसंग सतावतील. लहान मुलांचा उपद्रव त्रास देईल.