weekly horoscope 5th november 2023 to 11th november 2023
weekly horoscope 5th november 2023 to 11th november 2023Sakal

साप्ताहिक राशिभविष्य (०५ नोव्हेंबर २०२३ ते ११ नोव्हेंबर २०२३)

मन ही वस्तू नाहीये. शरीर हे वस्तू असल्यासारखे आहे. त्यामुळेच ते वस्तूंची गणना करते किंवा हल्लीच्या भाषेत माणसांचा मतदार संघ जपते.

परदेशगमनाचा योग

मेष : राशीच्या हर्षलचा ग्रहयोगांतून एक विचित्र प्रभाव राहील. प्रवास वा समारंभातून विचित्र घडामोडी होऊ शकतात. बाकी यंदाच्या दीपावलीत गुरुकृपा राहीलच. गुरुवार व्यावसायिक धनवर्षावाचा. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना परिस्थितीजन्य लाभ होईल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमनाचा योग. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार अग्निभयाचा.

प्रवासात काळजी घ्या

वृषभ : सप्ताहातील शुक्रभ्रमण दीपावली साजरी करेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्ती वैयक्तिक उत्कर्षातून प्रसन्न राहतील. विशिष्ट उपक्रम यशस्वी होतील. रोहिणी नक्षत्राच्या गृहिणींनी घरात मौल्यवान चीजवस्तू जपाव्या. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी दीपावलीत प्रवासात सांभाळावे.

तेजस्वी काळ, सुवार्ता मिळतील

मिथुन : दीपावलीत शुक्रभ्रमणाची तेजस्विता राहील. यंदाच्या दीपावलीत घरातील सुवार्तांची पार्श्वभूमी राहील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस चांदणे शिंपीत नेणारे. वास्तुप्रवेश. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम दिवाळसण. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारची गुरुद्वादशी गुरुकृपेची.

व्यावसायिक पतपुरवठा होईल

कर्क : सप्ताहातील ग्रहांच्या केंद्रप्रतियोगांची मालिका अपवादात्मक अडचणींतून नेऊ शकते; परंतु गुरुचे पाठबळ राहील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक पतपुरवठा. विशिष्ट ओळखी मध्यस्थीतून लाभ. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना पर्यटनातून आनंद. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार विचित्र नुकसानीचा.

नोकरी-व्यवसायात झेप घ्याल

सिंह : यंदाची दीपावली व्यावसायिक धनवर्षावाचीच. सरकारी माध्यमातून लाभ. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना सतत लाभ होतील. ता. ९ व १० हे दिवस नोकरी-व्यावसायिक झेप घेणारे ठरतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात मौल्यवान चीज वस्तू जपाव्या. बाकी दीपावली ध्येयपथाकडेच वाटचाल करणारी.

दुखापतींपासून काळजी घ्या

कन्या : यंदाच्या दीपावलीत शुक्रकलांचा उत्कर्ष रोषणाई करणारा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना धनत्रयोदशी खऱ्या अर्थाने धनसंपन्न करणारी, वैवाहिक जीवन फुलारेल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात दुखापतींपासून जपलंच पाहिजे. बाकी सप्ताह नोकरीत शुभलक्षणी. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना कामगार पीडा. विचित्र चोरी, नुकसानी होऊ शकते.

व्यावसायिक प्रदर्शनं लाभदायक

तूळ : सप्ताहात राशीच्या मंगळाचे फिल्ड राहील. सप्ताहात भावनोद्रेक टाळा. पंचमहाभुतांशी अरेरावी नको. वेंधळेपणा टाळा. बाकी दीपावलीचा शुभारंभ शुक्रकलांच्या उत्कर्षातूनच होईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना दैवी प्रचिती. विशिष्ट देवदर्शने. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ९ व १० हे दिवस व्यावसायिक प्रदर्शनातून लाभदायी. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार बेरंगाचा. प्रवासात खोळंबा.

व्यावसायिक तेजी राहील

वृश्चिक : सप्ताहात ग्रहांची समीकरणे विचित्र राहतील. नसत्या उठाठेवी टाळा. बाकी सप्ताह दीपावलीच्या आरंभी उत्तम व्यावसायिक तेजी ठेवेल. मात्र यंत्र उपकरणे ऐनवेळी दगा देऊ शकतात. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार धनवर्षावाचा. आदर सत्कार होईल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार फसवणुकीचा.

नोकरीत पगारवाढ होईल

धनू : नोकरी-व्यावसायिक पर्यावरण उत्तमच राहील. गुरुद्वादशीचा शुक्रवार ऐश्वर्यसंपन्न करणारा. मात्र सप्ताहात मित्रसंगतीतून त्रास होऊ शकतो. व्यसनी, जुगारी व्यक्तींचा संग नको. बाकी पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ७, ९, १० हे दिवस शुक्रकलांच्या उत्कर्षातून बोलतील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत पगारवाढ होईल.

संतसहवास लाभेल

मकर : सप्ताहातील मंगळभ्रमण ज्वालाग्राही राहील. वाहतुकीत जपा. नोकरीत वरिष्ठ सांभाळा. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना यंदाची दीपावली घरगुती सुवार्तांच्या पार्श्वभूमीवर बोलेल. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना धनत्रयोदशी संतसहवास घडवेल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार विचित्र नुकसानीचा.

धनाची चिंता जाईल, वसुली होईल

कुंभ : सप्ताह शेजाऱ्यांशी वाद उत्पन्न करणारा. व्यावसायिक वाहने, यंत्र उपकरणे आणि नोकरचाकरांपासून विरोधीच वाटतो. शततारका नक्षत्रास दीपावलीचा आरंभ विशिष्ट उंची खरेदीचा. ता. ९ नोव्हेंबरची एकादशी धनचिंता घालवणारी. वसुली होईल. पूर्वा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना राजकीय व्यक्तींकडून त्रास.

दीपावलीचे शुभसंकेत मिळतील

मीन : सप्ताहारंभ गुरु-शुक्रांच्या विशिष्ट स्थितीतून दीपावलीचे शुभसंकेतच देईल. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठी दैवी प्रचिती येईल. विशिष्ट गुप्तचिंता जाईल. व्यावसायिक मोठ्या धनवर्षावाची लक्षणे दिसतील. ता. ९ व १० हे दिवस मोठी ऐश्वर्याची दीपावली साजरी करतील. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्रास वैवाहिक जीवनातून भाग्योदय. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींनी फटाके जपून लावावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com